spot_img
अहमदनगरपारनेर-नगरची जागा 'शिवसेनेला'? शिवसैनिक लागले विधानसभेच्या तयारीला! 'बड्या' नेत्याचे सूचक वक्त्यव्य

पारनेर-नगरची जागा ‘शिवसेनेला’? शिवसैनिक लागले विधानसभेच्या तयारीला! ‘बड्या’ नेत्याचे सूचक वक्त्यव्य

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री:-
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु आपण जुन्या नव्या सैनिकांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला, हे मोठं काम आपण सर्वांनी केलं, ही हिम्मत आपण दाखवली याचं कौतुक केलं पाहिजे. त्यामुळेच लोकसभेच्या निकालामध्ये खासदार निलेश लंके यांच्या विजयात पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांचा सिंहाचा वाटा असल्याचे मत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी व्यक्त केले.

शिवसेनेच्या भगवा सप्ताहनिमित्त आयोजित भव्य मशाल यात्रेच्या शुभारंभप्रसंगी टाकळी ढोकेश्वर येथील कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाप्रमुख गाडे यांनी बोलताना पारनेरचे शिवसेना तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. डॉ.श्रीकांत पठारे हे पारनेर तालुक्याचे भूषण असून लोकसभा निवडणुकीत डॉ. श्रीकांत पठारे यांच्या कामाची व संघटनकौशल्याची चुणूक पक्ष श्रेष्ठींच्या लक्षात आलेली असून पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाची जागा हक्काने महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला ठेवणार असल्याचे सुचक विधान जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी केले.

शिवसेना पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात भगवा सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. यानिमित्ताने पारनेर तालुक्यात मशाल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे, युवासेना तालुका प्रमुख अनिल शेटे, महिला आघाडी प्रमुख प्रियंका खिलारी, शेतकरी आघाडी तालुकाप्रमुख गुलाबराव नवले, जेष्ठ नेते डॉ.भास्कर शिरोळे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक किसन सुपेकर, संतोष साबळे, संतोष येवले, उजागरे सर, बाबा रेपाळे, सरपंच रामदास खोसे, सुनिता मुळे, देवराम मगर, धनंजय निमसे, दिपक मावळे, नितीन आहेर, अनिकेत देशमाने, अक्षय गोरडे, शुभम गोरडे, सुयोग टेकुडे, तानाजी मुळे, मोहन पवार, मुकेश गवळी, डॉ.नीता पठारे, मंगल पठारे, राजू बोरूडे, अक्षय दुश्मन, अशोक बोरुडे, स्वप्नील पुजारी, प्रशांत निंबाळकर, विशाल पठारे, गोरख पठारे, मंगेश सालके, गंगाधर पठारे, श्याम पठारे, दत्ता टोनगे, महेंद्र पांढरकर, ऋषिकेश नरसाळे, दिपक सुपेकर, अशोक सालके, कानिफनाथ पठारे, रामेश्वर ठाणगे, अशोक भोसले, नितीन पठारे, पप्पू रोकडे, मोहित जाधव, विकास डेरे, ऋषिकेश माने, प्रदीप चौधरी, राहुल मोरे, अशोक चौधरी, अभिजीत पवार यांसह मोठ्या संखेने शिवसैनिक उपस्थिती होते.

डॉ. श्रीकांत पठारे यांनी भगवा सप्ताह व मशाल यात्रेबाबत माहिती समजावून सांगत संपूर्ण ताकतीने पारनेर तालुक्यात सर्व शिवसैनिक जोमाने उध्दव ठाकरे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्यासाठी मशाल यात्रेच्या माध्यमातुन जोमाने प्रचार करणार असल्याचे सांगितले तसेच तालुक्यातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.

पारनेर तालुक्यातून डॉ. श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मोठे शक्ती प्रदर्शन करत या भगव्या सप्ताहाला सुरुवात केली आहे. हा भगवा सप्ताह व मशाल यात्रा म्हणजे शिवसेना पक्षाची विधानसभेची तयारी समजली जात असून या माध्यमातुन शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाने प्रचाराचे रणशिंग फुंकले असल्याचे बोलले जात आहे.

पारनेरमध्ये शिवसैनिक लागले विधानसभेच्या तयारीला…
पारनेर तालुका हा शिवसेनेला मानणारा मतदार संघ आहे या मतदार संघामध्ये शिवसेनेचं मोठं संघटन असून अनेक सर्वसामान्य शिवसैनिक हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या विचारांना मानून काम करतात. भगवा सप्ताह व मशाल यात्रेच्या माध्यमातून पारनेर मध्ये शिवसैनिक शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी व पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार करण्यासाठी व भगवा झेंडा पुन्हा फडकविण्यासाठी कामाला लागले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावधान नगरकरांनो! शहरातील भेसळयुक्त तुपाचा पर्दाफाश, पुण्यात तयार करून नगर शहरात विक्री

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:- नगर शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे....

नगरमध्ये चाललंय काय? पोलिसांची गुंडागिरी?, दुकानदाराला मारहाण!, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद..

राहाता । नगर सहयाद्री:- राहाता तालुक्यातील कोल्हार गावात एका पोलीस हवालदाराने दुकान बंद करण्याच्या...

आजचे राशी भविष्य! आजचा दिवस नवीन यशांनी भरलेला, वाचा कोणाच्या आयुष्यात येणार भरभराट?

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आपल्या संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो हे...

अहमदनगर नव्हे आता अहिल्यानगर रेल्वेस्थानक, रेल्वेस्टेशनचेही नाव बदलले, सरकारकडून प्रक्रिया पूर्ण

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : अहिल्यानगरचे नामांतर केल्यानंतर आता रेल्वेस्थानकाच्या नामांतराचीही प्रक्रिया पूर्ण झाली आहे....