पारनेर । नगर सहयाद्री:-
पारनेर तालुका खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी २९ एप्रिल २०२५ रोजी पारनेर येथे विशेष संचालक मंडळाची सभा पार पडली. सहकारी आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या या संस्थेच्या अध्यक्षपदी दत्तात्रय जयराम रोकडे, तर उपाध्यक्षपदी प्रसाद भरतराव शितोळे पाटील यांची बिनविरोध निवड झाली. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार काशिनाथ दाते, माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, भाजपचे राहुल पाटील शिंदे आणि विश्वनाथ कोरडे यांच्या निर्णयाने ही निवड प्रक्रिया यशस्वी झाली.
यापूर्वी बाबासाहेब खिलारी (अध्यक्ष) आणि गंगाधर रोहकले (उपाध्यक्ष) यांनी वरिष्ठांच्या आदेशाने राजीनामे दिल्याने ही निवड आवश्यक ठरली होती. अनेक संचालकांनी या पदांसाठी इच्छा दर्शवली होती, त्यामुळे निवडीपूर्वी रस्सीखेच आणि चर्चांना उधाण आले होते. मात्र, वरिष्ठ नेत्यांनी सर्वांना विश्वासात घेत बिनविरोध निवडीचा मार्ग प्रशस्त केला. सहाय्यक निबंधक विकास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.
भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचे या संस्थेवर एकहाती वर्चस्व आहे. त्यामुळे नवनिर्वाचित पदाधिकारी तालुक्याच्या सहकारी क्षेत्राला नवी दिशा देतील, अशी अपेक्षा आहे. सर्व संचालकांनी निवडीला पाठिंबा दर्शवला असून, ही निवड सहकार आणि राजकारणाच्या दृष्टिकोनातून पारनेर तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे, लाडकी बहीण योजना समितीचे तालुका अध्यक्ष सुनील थोरात, दत्ता नाना पवार, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पंकज कारखिले, भाजप जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी रोकडे, दादाभाऊ वारे, सरपंच लहू भालेकर, रेखा मते, ज्योती ठुबे, सतीश पिंपरकर, संग्राम पावडे, मधुकर पठारे, बाबासाहेब खिलारी, गंगाधर रोहकले, प्रमोद कावरे, भाऊसाहेब मेचे, शैलेंद्र औटी, भरत गट, सिताराम देठे, लहू रावडे, संदीप ठुबे, अनिल दिवटे, कारभारी गायकवाड, संजय मते, संतोष आवारी, शशी करखिले, बाजीराव अलभर, आदी उपस्थित होते.