spot_img
अहमदनगरधक्कादायक! आई-वडील वॉचमन म्हणून काम करायचे, कामाला गेल्यानंतर १० वर्षांच्या मुलीसोबत घडलं...

धक्कादायक! आई-वडील वॉचमन म्हणून काम करायचे, कामाला गेल्यानंतर १० वर्षांच्या मुलीसोबत घडलं असं काही..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
येथील सावेडी उपनगरातील एका अपार्टमेंटमध्ये वॉचमन म्हणून राहणाऱ्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक प्रकार घडल्याची बातमी समोर आली आहे. आई-वडील कामाला गेले की संधीचा फायदा घेत एका नराधमांनी अत्याचार केला. मुलीला त्रास झाल्याने तिची वैद्यकीय उपचार घेतले. तेव्हा ती गर्भवती असल्याचे समजले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध  तोफखाना पोलिस ठाण्यात अत्याचार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलगी आई-वडिलांबरोबर सावेडीतील पाइपलाइन भागात एका अपार्टमेंटजवळील पत्र्याच्या शेडमध्ये राहत होती. तिचे आई-वडील वॉचमन म्हणून काम करीत होते.

डिसेंबर २०२३ पासून वारंवार आरोपीने तिचे आई-वडील घरी नसल्याचा फायदा घेत पीडितेवर अत्याचार केला. मुलीला त्रास झाल्याने तिची वैद्यकीय उपचार घेतले. तेव्हा ती गर्भवती असल्याचे समजले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या विजयाची सुरवात, भरघोस यश प्राप्त होणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता...

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...