कान्हूरपठार । नगर सहयाद्री:- लालपरीची सेवा करणाऱ्या वडिलांचे लाल दिव्याच्या गाडीतून फिरण्याचे स्वप्न कान्हूरपठारच्या रोहितने पूर्ण करून दाखवले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत रोहित शिंदेची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. यामुळे त्याचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
रोहित चे वडिल सुभाष शिंदे तीस वर्ष पारनेर आगारात वाहक म्हणून काम करत होते. वडिलांच्या मानधन वर कुटुंब चा उदरनिर्वाह शक्य नसल्याने आई रेखा शिंदे मजुरी करत असत, लहानपणा पासून कुटूंबाचं संघर्ष रोहितने उघड्या डोळ्याने पहिला. लालपरीची सेवा करणाऱ्या वडिलांना लाल दिव्याच्या गाडीतून फिरवायचा हा मनाशी निश्चय करून अभ्यासाला सुरवात केली.
रोहितने प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण कान्हूरच्या जनता हायस्कूल मध्ये पूर्ण केले. बारावी नंतर काय? हा सर्वसामान्य प्रश्न अन हाच प्रश्न घेऊन पारनेर महाविद्यालयात प्रवेश घेत रसायन शास्र विषयात पदवी मिळवली. पण स्वप्नातला लाल दिवा अन अधिकारी बनायचं स्वप्ण शांत बसू देत नव्हतं. पुण्याच्या रयत प्रबोधिनी मध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सुरवात केली. दरम्यान वडिल निवृत्त झाले. आर्थिक अडचण उभी राहिली पन न खचता जोमाने अभ्यास करून संघर्ष मधून त्याने हे यश मिळवले.
यशाला शॉर्ट कट नसतो. संघर्षा शिवाय जीवनात यश मिळत नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थीनी जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षेकडे वळावे असं मत रोहितने नगर सह्याद्री शी बोलतांना व्यक्त केले. त्याच्या या यशात कुटुंब मार्गदर्शक शिक्षक व रयत प्रबोधिनी यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांंच्या या यशाबद्दल कान्हूरपठार ग्रामस्थांनच्या वतीने संपूर्ण गावांमधुन मिरवणूक काढत अभिनंदन करण्यात आले.