spot_img
ब्रेकिंगपंकजा मुंडेंचे राजकीय ग्रहण सुटलं; भाजपने घेतला मोठा निर्णय...

पंकजा मुंडेंचे राजकीय ग्रहण सुटलं; भाजपने घेतला मोठा निर्णय…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री
विधान परिषदेवरील ११ जागांच्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने पाच जणांना तिकिटं जाहीर केली आहेत. पाच वर्षांपासून राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पंकजा मुंडे यांना भाजपने तिसरी संधी दिली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे पाच वर्षांनी विधिमंडळात दिसणार आहेत. पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे या पाच जणांना भाजपने विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे.

पंकजा मुंडे यांचा संसदीय राजकारणातील प्रवास काहीसा खडतर राहिला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून त्या महायुतीतर्फे भाजप उमेदवार होत्या. परंतु महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पंकजांना पराभवाची धूळ चारली.

याआधी, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातून बंधू धनंजय मुंडेंकडून त्यांना पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर पंकजांना लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालीच नाही. दोन वेळा खासदार राहिलेल्या बहीण प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करत भाजपे पंकजा मुंडे यांना तिकीट दिलं होतं, मात्र ते राखण्यात त्यांना यश आलं नव्हतं.

दरम्यानच्या काळात विधानपरिषद असो किंवा राज्यसभा, प्रत्येक निवडणुकीच्या वेळी पंकजा मुंडे यांच्या नावाची केवळ चर्चा होत असे, मात्र त्यांना एकदाही उमेदवारी मिळाली नव्हती. २०१९ च्या विधानसभेला सुरु झालेला त्यांचा राजकीय संन्यास कायम राहिला. त्याआधी देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये पंकजा मुंडे यांनी महिला व बालकल्याण विभागाचे मंत्रिपद सांभाळले आहे.

विधान परिषदेच्या ११ जागांच्या निवडणुकीसाठी उद्या म्हणजेच २ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. १२ जुलै रोजी रोजी मतदान असून त्याच दिवशी मतमोजणीनंतर निकाल जाहीर होणार आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...