spot_img
अहमदनगरदारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पाणीपुरीवाल्याला मारहाण, नगरमध्ये 'येथे' घडला प्रकार

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पाणीपुरीवाल्याला मारहाण, नगरमध्ये ‘येथे’ घडला प्रकार

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री

शहरातील दिल्लीगेट परिसरात पाणीपुरी विक्रेत्याने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग आल्याने ओळखीच्या इसमाने लाकडी दांड्याने डोयात मारहाण केली. या हल्ल्यात पीडित जखमी झाला असून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. ही घटना १८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता घडली.

फिर्यादी देवेंद्र विरसिंग कुसवाह (वय ३४, रा. दातरंगे मळा, नालेगाव, अहिल्यानगर) हे दिल्लीगेट परिसरात पाणीपुरीची टपरी लावून उदरनिर्वाह करतात. गुरुवारी रात्री ते टपरीवर असताना आदित्य लहु सकट (रा. मुन्सीपल कॉलनी, नालेगाव, अहिल्यानगर) व त्याचा एक अनोळखी साथीदार दारूच्या नशेत तेथे आले. त्यांनी देवेंद्रकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र देवेंद्र यांनी नकार दिल्याने आदित्य सकट चिडला व मी तुला पैसे न दिल्याचा बदला घेतो असे म्हणत निघून गेला.

थोड्याच वेळात रात्री आठच्या सुमारास आदित्य सकट परत आला. त्याच्या हातात लाकडी दांडा होता व सोबत तोच अनोळखी इसम होता. काहीही कारण नसताना त्याने देवेंद्रच्या डोयात दांडयाने जोराचा प्रहार केला. या प्रहारात देवेंद्रच्या डोयातून रक्त वाहू लागले व ते खाली कोसळले. दरम्यान, आदित्य सकट याने मी तुला आज जिवंत सोडणार नाही असे म्हणत टपरीवर दांडके मारून नुकसान केले.

त्याच्यासोबत असणार्‍या अनोळखी साथीदारानेही शिवीगाळ केली व जर पुन्हा पैसे दिले नाहीस तर पुढच्या वेळी जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.या घटनेत जखमी झालेल्या देवेंद्रला त्याचा भाऊ अनारसिंग कुसवाह याने तातडीने सिव्हिल हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर देवेंद्र यांनी पोलीस ठाण्यात हजेरी लावून फिर्याद दिली. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी आदित्य लहु सकट व त्याच्या अनोळखी साथीदाराविरुद्ध मारहाण, धमकी व नुकसानप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ गडाख करीत आहेत.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हिंदू संकृतीला डळमळीत करणार्‍या वोकिझम संकटाला समजून घ्या; शिवशंभू व्याख्याते नीलेश भिसे

उत्कृष्ट आरास स्पर्धेत सिद्धेश्वर तरुण मंडळ व समर्थ युवा प्रतिष्ठान प्रथम अहिल्यानगर | नगर सह्याद्री आता...

चास घाटात दरोडा!; ‘ती’ टोळी पकडली

चास घाटाजवळील घटना; सात लाख ९० हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे...

धक्कादायक! नाशिकमध्ये गावगुंडांकडून पत्रकारांना बेदम मारहाण

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये पत्रकारांना गावगुंडानी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर...

पारनेर राष्ट्रवादीत स्टेटस वॉर!; नेमका काय घडला प्रकार पहा…

आमदार दाते यांच्या ‘बापजाद्या’ उल्लेखाने झावरे समर्थक नाराज पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयाच्या राजकारणात मोठा...