spot_img
ब्रेकिंग'पै. योगेश फुलमाळीची अंतिम सामन्यासाठी निवड'

‘पै. योगेश फुलमाळीची अंतिम सामन्यासाठी निवड’

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेला बुधवारी सायंकाळी अहिल्यानगर मध्ये मोठ्या उत्साहात व चैतन्यपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. येथील आखाड्यांमध्ये प्रेक्षणीय लढती पहावयास मिळाल्या. माती व गादी विभागातील 57 आणि 86 वजनी गटातील झालेल्या कुस्त्या अटीतटीच्या झाल्या. यावेळी डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या कुस्त्या शौकिनांना पहावयास मिळाल्या. यातील अनेक कुस्त्या उत्कंठावर्धक व अटीतटीच्या झाल्या. आज सायंकाळी अहिल्यानगरचा पै. योगेश फुलमाळी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी लढणार आहे.

महाराष्ट्र केसरी किताब साठी आज सायंकाळी कुस्त्यांचा थरार रंगणार आहे. यासाठी सकाळपासूनच आलेल्या कुस्तीगीरांचे गटाप्रमाणे वजनाचे मोजमाप व कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. तसेच आखाड्यावर खेळणाऱ्या मल्लांची डोपिंग चाचणी ही घेण्यात येत आहे. कुस्तीच्या आखाड्यामध्ये हलगी, संबळ, तुतारीचे वादन उत्साह वाढवणारे असते. नगरमध्ये सुरु असलेल्या कुस्त्यांसाठी खास कुस्तीगर संघाचे अध्यक्ष आ.संग्राम जगताप यांनी कोल्हापूर येथून रानवाद्य हलगी पथक आणले आहे.

या पथकाने कुस्तीच्या आखाड्यात नवचैतन्य व रंगत आणली आहे. माती व गादी आखाड्यांच्या भोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने क्रीडानगरीचे सौदर्यात भर पडली आहे. हा दिमागदार सोहळा पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी हजारो कुस्ती प्रेमींनी हजेरी लावल्याने पहिल्याच दिवशी वाडियापार्क हाउसफुल झाले होते. स्पर्धेच्या बारकाईने नियोजनासाठी जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पै. अर्जुन शेळके व पै. अशोक शिर्के, सचिव प्रा.डॉ.पै.संतोष भुजबळ, सहसचिव पै.प्रविण घुले, कार्यालयीन सचिव निलेश मदने आदींसह सर्व पदाधिकारी आखाड्यात तळ ठोकून उपस्थित आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भाजप-राष्ट्रवादीचं ठरलं!, महापालिका निवडणुकीत युती; एमआयएमही उतरणार मैदानात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना आता...

नेपाळमध्ये राडा! आंदोलकांनी संसद पेटवली, पंतप्रधानांचा राजीनामा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमधील परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. निदर्शनांनी हिंसक...

चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे शुक्रवारी भूमिपूजन; आमदार कर्डिले यांची माहिती, कोण कोण राहणार उपस्थिती?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे भूमिपूजन येत्या शुक्रवार दिनांक 12...

विसर्जन मिरवणुकीत युवकाचा खून; कुठे घडली घटना?

सांगली । नगर सहयाद्री:- मिरज तालुक्यातील अंकली गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांमध्ये सुरू...