spot_img
अहमदनगरसंतापजनक! रिक्षाचालकाचे नर्सिंगच्या तरुणीसोबत नको ते कृत्य? गुन्हा दाखल

संतापजनक! रिक्षाचालकाचे नर्सिंगच्या तरुणीसोबत नको ते कृत्य? गुन्हा दाखल

spot_img

कोपरगाव। नगर सहयाद्री
सोमवारी सायंकाळी एका तरुणीशी रिक्षा चालकाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा संतापजनक प्रकार नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात घडला आहे. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी: कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल येथे निमगाव कोऱ्हाळे येथील पीडित मुलगी व तिची मैत्रीण नर्सिंगचे शिक्षण घेत आहेत. त्या नेहमीप्रमाणे सोमवार दि.२ एप्रिल रोजी हॉस्पिटलमध्ये ड्युटी करून सायंकाळी साडेसातच्या दरम्यान शिर्डी निमगावकडेघरी निघाल्या होत्या.

पुणतांबा फाट्यापर्यंत पोहोचल्यावर तेथे आरोपी अरबाज रमजान शेख (रा. श्रीरामनगर, शिर्डी) हा आपल्या कडील रिक्षा घेऊन पुणतांबा फाट्यावर उभा होता. पीडित मुलगी व तिच्या मैत्रिणीने त्यास शिर्डीला जाणार आहे का? असे विचारले असता तो हो म्हणाला व त्याने त्या दोन मुलींना आपल्या रिक्षात बसवले.

आरोपी अरबाज याने शिर्डीकडे रिक्षा न घेता नागपूर हायवेच्या दिशेने सुसाट वेगाने चालवून रस्त्याच्या कडेला असलेल्या काटवनानजीक रिक्षा थांबवली. त्यानंतर त्या दोघी पैकी फिर्यादी मुलीचा हात घरून काटवनाकडे ओढत नेऊ लागला. हे दृश्य पाहून दुसरी मुलगी जोरजोरात ओरडायला लागली.

तिच्या ओरडण्यामुळे तेथून ट्रॅक्टर घेऊन जाणाऱ्या एका शेतकऱ्याने व जमावाने त्या मुलीला आरोपीच्या ताब्यातून सोडवले व तात्काळ कोपरगाव पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली. माहिती मिळताचपोलिसांनी धाव घेत काटवनात लपलेल्या आरोपी अरबाज यास शिताफीने पकडून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात हजर केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्याला गोळ्या घाला…; निंबळक बायपास चौकात रास्तारोको

हिंगणगाव, हमीदपूर, निंबळक, इसळक, खारेकर्जुने ग्रामस्थांचा निंबळक बायपास चौकात रास्तारोको अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गेल्या...

आता शिवशक्ती बरोबर भीमशक्ती; ‘महापालिका निवडणुकीसाठी आघाडी’; किरण काळे यांनी दिली मोठी माहिती..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नगरकरांनी मनपा कारभारासाठी कायम...

चुलत्याला वाचवण्यासाठी गेलेल्या पुतण्यावर धारदार शस्त्राने सपासप हल्ला, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्रील:- माझ्या शेतातील लाकडे का आणली? असा जाब विचारत एका तरुणाला...

शिवसेनेला भाजपचा झटका; ‘बड्या’ नेत्याचा भाजपत प्रवेश!

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी अहिल्यानगर शहरातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली...