spot_img
अहमदनगरसंतापजनक! डॉक्टरांनी नको त्या ठिकाणी हात लावला; तपासणीसाठी आलेल्या विद्यार्थिनीसोबत घडलं असं...

संतापजनक! डॉक्टरांनी नको त्या ठिकाणी हात लावला; तपासणीसाठी आलेल्या विद्यार्थिनीसोबत घडलं असं काही..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
शहरात तपासणीसाठी आलेल्या २१ वर्षीय विद्यार्थिनीवर डॉक्टराने नको त्या ठिकाणी हात लावून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी डॉक्टरासह हॉस्पिटलमधील महिला कर्मचारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहाता (साकुरी) येथील विद्यार्थिनी श्रीरामपूर येथे शिक्षणासाठी वसतिगृहात राहते. ५ ऑगस्ट रोजी ती आजारी पडल्यामुळे तिला मैत्रिणी व रेक्टरच्या सोबत नेवासा रस्त्यावरील डॉ. कुटे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तेथील कर्मचारी महिलेने तिला ओपीडीत नेले, जिथे डॉ. रवींद्र कुटे यांनी तपासणीसाठी विचारपूस केली आणि झोपण्यास सांगितले.

तपासणीदरम्यान, डॉ. कुटे यांनी विद्यार्थिनीच्या नको त्या ठिकाणी हात लावून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनीने मदतीसाठी आवाज दिला. तिच्या आवाजाने आलेल्या मैत्रिण व रेक्टरला हॉस्पिटलच्या कर्मचारी महिलेने व डॉक्टरांनी शिवीगाळ केली आणि झाडूने मारले.

या घटनेने घाबरलेल्या विद्यार्थिनींनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून डॉ. रवींद्र कुटे आणि महिला कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांसाठी दिलासादायक बातमी!; ‘त्या’ यादीत आपले नाव आहे का? ते पाहा…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री;- नगर अर्बन बँकेत पाच लाखाहून अधिक रकमेच्या ठेवी अडकलेल्या ठेवीदारांना निम्मी...

आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी; ‘दो दिन के अंदर…’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार संग्राम जगताप यांना बुधवारी रात्री...

आजचे राशी भविष्य ! ‘या’ राशींसाठी ‘गुरुवार’ कसा? पहा..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते...

‘स्थानिक स्वराज्य’ संस्थांच्या निवडणुकीबाबत मंत्री विखे पाटलांचे महत्वाचे स्टेटमेंट; लवकरच..

स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका लवकरच; प्रदेशाध्यक्ष आ.चव्हाणांना दिल्या शुभेच्छा   शिर्डी । नगर सहयाद्री  पंतप्रधान नरेंद्र मोदी...