Crime News: एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. घराजवळ राहणाऱ्या एका अल्पवयीन तरुणाने नऊ वर्षीय चिमुरडीवर स्वच्छतागृहात लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कोंढवा पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी: पीडित मुलगी आणि आरोपी हे एकाच परिसरात राहतात. ही घटना ३ मे रोजी रात्री १० वाजता घडली. पीडित चिमुरडी रात्री स्वच्छतागृहात गेली होती. यावेळी आरोपीने देखील तिच्या मागोमाग प्रवेश करत दरवाजा लावून घेतला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. जबरदस्ती केल्यानंतर कुणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी या आरोपीने पीडित मुलीला दिली.
मात्र घरी गेल्यानंतर पोट दुखू लागल्याने पीडित मुलीने आईला सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने तिच्या अंगावरून कपडे काढून पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पिडीतेच्या आईने कोंढवा पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली आहे.