spot_img
ब्रेकिंगसंतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

spot_img

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावून त्यांना लुटण्यात आले आणि त्यानंतर एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

सदरची घटना रविवारी दि. २९ रोजी रात्री घडली. वारकरी गट विश्रांतीसाठी चहासाठी थांबला असताना दोन जण दुचाकीवरून आले आणि त्यांनी वारकऱ्यांना धमकावत गळ्याला कोयता लावून लुटले. त्यानंतर या दोघांनी अल्पवयीन मुलीला जवळच्या झुडपांकडे ओढत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या अमानवी घटनेमुळे संपूर्ण दौंड तालुका सुन्न झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच दौंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. वारकरी वारीत सहभागी असताना अशा प्रकारच्या घटनांमुळे राज्यातील सामाजिक आणि धार्मिक वातावरण बिघडू शकते, अशी चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भाजप-राष्ट्रवादीचं ठरलं!, महापालिका निवडणुकीत युती; एमआयएमही उतरणार मैदानात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना आता...

नेपाळमध्ये राडा! आंदोलकांनी संसद पेटवली, पंतप्रधानांचा राजीनामा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमधील परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. निदर्शनांनी हिंसक...

चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे शुक्रवारी भूमिपूजन; आमदार कर्डिले यांची माहिती, कोण कोण राहणार उपस्थिती?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे भूमिपूजन येत्या शुक्रवार दिनांक 12...

विसर्जन मिरवणुकीत युवकाचा खून; कुठे घडली घटना?

सांगली । नगर सहयाद्री:- मिरज तालुक्यातील अंकली गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांमध्ये सुरू...