spot_img
अहमदनगरसंतापजनक! रुग्णवाहिकेत आशा वर्करसोबत भयंकर घडलं, रात्री परतताना चालकाने केलं असं काही..

संतापजनक! रुग्णवाहिकेत आशा वर्करसोबत भयंकर घडलं, रात्री परतताना चालकाने केलं असं काही..

spot_img

Maharashtra Crime News : महिलांचा लैंगिक छळ, अत्याचाराच्या घटना अजूनही थांबत नाहीत. अशात सहकाऱ्याकडूनच महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ करण्यात आल्याची संतापजनक घटना नाशिक जिल्ह्यात उघडकीस आली आहे. आशा वर्करने दिवसभर ड्युटी केल्यानंतर रात्री परत येत असताना सहकारी असलेल्या रुग्णवाहिका चालकाकडून आशा वर्करचा लैंगिक छळ करण्यात आला. या घटनेने आयटक संघटना आक्रमक झाली आहे.

राज्यात दररोज कुठे ना कुठे महिला, मुलींवरील अत्याचार, लैगिंक छळ होत असल्याच्या घटना घडत आहेत. अशात नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यात सदरची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेत कानळदच्या आशा वर्करचा सहकारी असलेल्या ॲम्बुलन्स चालकाकडून लैंगिक छळ करण्यात आला आहे. सदरची घटना १८ ओक्टोम्बरच्या रात्री घडली आहे.

दरम्यान १८ ऑक्टोबरला ड्युटी दरम्यान हा संतापजनक प्रकार घडला आहे. यात पीडित आशा वर्कर यांनी दिवसभर गर्भवती महिलांना रुग्णवाहिकेतून देवगाव, निफाड आणि नाशिक जिल्हा रुग्णालयात नेण्याची सेवा बजावली. दरम्यान रात्री ड्युटी आटोपल्यानंतर रुग्णवाहिकेतूनच परत येण्यासाठी निघाल्या होत्या. परतताना ॲम्बुलन्स चालकाने सहकारी असलेल्या आशा वर्कर सोबत गैरवर्तन केल्याची तक्रार देण्यात आली आहे.

या घटनेनंतर आयटक संलग्न आशा व गटप्रवर्तक संघटना आक्रमक झाली असून घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच आरोपीवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय महिला आरोग्य सेवकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस धोरण जाहीर करण्याची मागणी असून आशा वर्कर समाजाच्या आरोग्यरक्षक असून त्यांचा सन्मान आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे. तर घटनेमुळे राज्याच्या आरोग्य यंत्रणेच्या जबाबदारीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अक्षय कर्डिलेंना जिल्हा बँकेत तोच न्याय मिळणार का?

अहिल्यानगर / नगर सह्याद्री आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली निधनानंतर जिल्ह्याच्या राजकारणासह जिल्हा बँकेत...

..आता दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे, अशी तयारी करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील विरोधकांनी निवडणूक आयोगाच्याविरोधात आता एल्गार पुकारला आहे. विरोधकांनी रस्त्यावर उतरून...

हवामान खात्याची महत्वाची अपडेट, काय दिला इशारा?, वाचा सविस्तर

मुंबई । नगर सहयाद्री:- कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून...

अहिल्यानगर जिल्ह्यात राजकीय उलथापालथ; नगराध्यक्षपदासाठी जोरदार लढती! ‘या’ पक्षाचा ‌‘स्वबळाचा नारा‌’

श्रीगोंदा । नगर सहयाद्री: श्रीगोंदा तालुक्यात सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून विविध पक्ष...