spot_img
ब्रेकिंगविसर्जन मिरवणुकीत युवकाचा खून; कुठे घडली घटना?

विसर्जन मिरवणुकीत युवकाचा खून; कुठे घडली घटना?

spot_img

सांगली । नगर सहयाद्री:-
मिरज तालुक्यातील अंकली गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांमध्ये सुरू झालेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या २५ वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली. शीतल धनपाल पाटील असे मृत युवकाचे नाव आहे.

रविवार ८ सप्टेंबर रोजी रात्री गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना दोन गटांमध्ये वाद झाला. या वादात शीतल पाटील हा शांतता राखण्यासाठी वाद सोडवण्यासाठी पुढे गेला. मात्र, त्याचवेळी काही हल्लेखोरांनी त्याच्यावर चाकूने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर सांगली ग्रामीण पोलिसांनी तातडीने कारवाई करत विकास बंडू घळगे (३५), क्षितिज ऊर्फ आप्पा शशिकांत कांबळे (२८), आणि आदित्य शंकर घळगे (२२, सर्व रा. अंकली) या तिघांना अटक केली आहे. त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

शीतलच्या मृत्यूमुळे अंकली गावात शोककळा पसरली असून, सोमवारी सकाळी पार्थिव गावात आणण्यात आल्यानंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. या घटनेचा निषेध म्हणून गाव बंद पाळण्यात आला. पोलिसांनी घटनेचा अधिक तपास सुरू केला असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भाजप-राष्ट्रवादीचं ठरलं!, महापालिका निवडणुकीत युती; एमआयएमही उतरणार मैदानात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना आता...

नेपाळमध्ये राडा! आंदोलकांनी संसद पेटवली, पंतप्रधानांचा राजीनामा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमधील परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. निदर्शनांनी हिंसक...

चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे शुक्रवारी भूमिपूजन; आमदार कर्डिले यांची माहिती, कोण कोण राहणार उपस्थिती?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे भूमिपूजन येत्या शुक्रवार दिनांक 12...

बिबट्याच्या हल्ल्यातील कुटुंबीयांची खासदार नीलेश लंके यांनी घेतली भेट

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील कळस गावात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या गणेश तुळशीराम...