spot_img
ब्रेकिंग...अन्यथा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार!; दिलीप वळसे-पाटील

…अन्यथा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार!; दिलीप वळसे-पाटील

spot_img

शिर्डीत राष्ट्रवादीचे शिबिर | सुनेत्रा-अजित पवार साईचरणी नतमस्तक
शिर्डी | नगर सह्याद्री:-
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र महायुतीसह महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वबळावर लढणार? याबाबत चर्चा सुरू आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी येत्या काही महिन्यांत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील पक्षांशी आघाडी झाली तर ठिक अन्यथा राष्ट्रावादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसांचे नवसंकल्प शिबिर शिर्डी येथे सुरू झाले आहे. यासाठी माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील हे सुद्धा शिडला पोहचले आहेत. यावेळी वळसे पाटील यांनी केलेल्या विधानानंतर चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीच्या या अधिवेशनात सहभागी होण्यापूव दिलीप वळसे-पाटील यांनी साई बाबांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, दोन दिवस होणाऱ्या या शिबिरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर आम्ही निवडणुकीची रणनीती ठरवणार आहोत.

पुढे ते म्हणाले, सध्या ओबीसी आरक्षणाचा खटला सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे या खटल्याच्या निकालानंतर निवडणुकीची प्रक्रिया आणि कसे लढायचे याबाबत निर्णय होईल. पण जर आघाडी झाली तर ठीक, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढण्यासाठी तयार आहे, असे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

जेथे शक्य तेथे एकत्र लढणार
लोकसभा आणि विधानसभा या दोन मोठ्या निवडणुका असतात. तिथे युती करुन लढणं आवश्यक असतं. पण स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवर विशेष करुन जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका इथे कार्यकर्त्यांची निवडणूक लढण्याची इच्छा असते. तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांच्या भावना असतात. त्यामुळे तडजोड करावी लागते. त्यामुळे जिथे शक्य असेल, तिथे महायुती म्हणून लढू. पण समजा एखाद्या ठिकाणी नाही लढलो, तर निवडणूक झाल्यानंतर जिथे महायुती बनवू शकतो, तिथे प्रयत्न करु जम्मू, हरियाणाप्रमाणे दिल्लीतही भाजपच विधानसभेची निवडणूक जिंकेल असा विश्वास प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला.

काही घडलं असेल तर दूर करू
छगन भुजबळ यांची नाराजी, त्यांची अधिवेशनाला उपस्थिती यावरही प्रफुल पटेल बोलले. छगन भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत. ही घरातली गोष्ट आहे. मुंबईत माझी आणि भुजबळ यांची भेट झाली. काही गोष्टी असतात. पण त्यांची नाराजी टोकाची नाही. घरात बसून मार्ग काढू शकत नाही, अशी स्थिती नाहीय. भुजबळ पक्षाचे आधारस्तंभ आहेत. 99 व्या साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हापासून ते पक्षाचे फ्रंटलाइन नेते आहेत. पक्षाने अपमानित केल्याची त्यांची भावना आहे? भुजबळ आणि मी एका परिवारात, एका पक्षात काम करतो. काही घडलं असेल, तर दूर करु असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

नाराजी दूर, छगन भुजबळ यांची शिर्डीतील शिबिराला उपस्थिती
राज्य मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज झाले आहे. जहां नहीं चैना वहां नहीं रहना, असं म्हणत त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. यानंतर गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराला छगन भुजबळांनी हजेरी लावली. नाराजी दूर झाली हा मुद्दा येत नाही. हे पक्षाचं शिबीर आहे. कोणाही एका व्यक्तीचं शिबीर नाही. काल प्रफुल्ल पटेल हे मला येऊन भेटले. त्यांनी दोन तास चर्चा केली. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही थोडावेळ यायला हवं. सुनील तटकरे यांनीही सांगितलं की तुम्ही थोडावेळ या. मला त्यांनी विनंती केली होती की थोडावेळ तरी या. म्हणून मी आलेलो आहे. याचा अर्थ सर्व काही स्वच्छ झालं असं होत नाही, असे आ. छगन भुजबळ म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महानगरपालिकेची कारवाई; पाच घर सील, दोघांचे नळ कनेक्शन तोडले

थकबाकीदारांनी शास्तीमाफीचा लाभ घेऊन तत्काळ कर भरावा व कारवाई टाळावी; आयुक्त यशवंत डांगे अहिल्यानगर ।...

संग्राम जगताप : ज्वलंत हिंदुत्वाचा भगवा अंगार

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अल्पसंख्याक समाजाच्या गठ्ठा मतांना फाट्यावर मारणारा अजित पवार यांच्या गटातील राज्यातील एकमेव...

आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यात ‘तो’ पॅटर्न; मंत्री दादा भुसे यांनी केले जाहीर

मुंबई | नगर सह्याद्री राज्यतील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडे (सीबीएसई) पालकांचा वाढत कल पाहून राज्य...

सत्तांतरामुळे बीडची पुनरावृत्ती नगरमध्ये टळली’; डॉ. सुजय विखे पाटील यांचा टोला

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दुर्दैवाने, मी राजकारणातील अभिनयगिरीत अपयशी ठरलो, पण प्रामाणिकपणे विकासकामे केली आणि...