अहमदनगर / नगर सह्याद्री : शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवप्रहार संघटनेच्या वतीने अहमदनगर शहरात दोन दिवशीय शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवप्रहार आयोजित शिवजयंती उत्सवाचे यंदाचे हे १९ वे वर्ष आहे.
शिवजयंती उत्सवाच्या पहिल्या दिवशी युवा शाहीर रामानंद उगले यांचा ‘शाहिरी शिवदर्शन’ या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (दि.18 फेब्रुवारी) सायं.6 वा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, भिस्तबाग येथे आयोजित करण्यात आला आहे.
तसेच दुसऱ्या दिवशी शिवजयंती दिनी सकाळी ७ वा.शिवपूजन व सायंकाळी ७ वा. भव्य रोषणाई व आतिषबाजी करुन शिवछत्रपतींचा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. आयोजित कार्यक्रमांना शिवप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवप्रहार संघटनेच्या वतीने राम झिने, आदिनाथ चंद्रे, संदीप संसारे, संदीप सायंबर, प्रशांत लवांडे, गोरख आढाव आदी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.