पारनेर | नगर सह्याद्री
पारनेरकर रहिवाशी संघ (मुंबई स्थित) कामोठे येथे दहीहंडी उत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल ५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांची बक्षिसे गोविंदा पथकासाठी जाहीर करण्यात आली आहे. या उत्सावाहांचे दुसरे वर्ष असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पारनेरकर रहिवाशी संघ (मुंबई स्थित) कामोठे येथे सलग दुसर्या वर्षी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या संघाने श्रध्दास्थान प्रेरणास्थान स्वातंत्र्यसैनिक सेनापती बापट, पद्मभूषण अण्णासाहेब हजारे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या दैवतांचा आदर्श नजरेसमोर ठेवून वारसा मराठी संस्कृतीचा. सण आनंदाचा या अनुषंगाने दहीहंडी उत्सवाचा इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे.
तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोविंदा…. गोपाळा गोपाळा देवीकीनंदन गोपाळा…यशोदेच्या तान्ह्या बाळा गोविंदा रे गोपाळा हा समृद्ध वारसा सलग दुसर्या वर्षाकडे वाटचाल करत आहे. हा दहीहंडी उत्सव २०२४ कामोठे ठिकाण संत शिरोमणी तुकाराम महाराज मंदिर, सेटर ३६, कामोठे येथे २७ ऑगस्ट २०२४ रोजी संपन्न होणार आहे. यासाठी रकमेची ५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांची बक्षिसे व भव्य चषक, महिलांसाठी लकी ड्रॉ पध्दतीने पैठणी आणि महिला पथकाची मानाची दहिहंडी विशेष आकर्षण असणार आहे.
दरम्यान दिनांक २७ ऑगस्ट सकाळी १० वाजता दहिहंडी पुजन व छत्रपती शिवाजी महाराज आरती करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता दहिहंडी पथके सलामी देऊन सुरुवात होणार आहे. दुपारी ३ ते ५ वाजता प्रसिद्ध निवेदक उत्तमजी घोलप यांचा महिलांसाठी होम मिनीस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे. सायकांळी ५ वाजता सुश्राव्य भजनांचे आयोजन करण्यात आले आहे. सायकाळी ६ वाजता आर्केस्ट्रा व सांस्कृतीक कार्यक्रम तसेच मानाची पथके सलामी, विशेष आकर्षण महिला पथकाची मानाची दहिहंडी होणार आहे. तर रात्री ९.३० वाजता कार्यक्रमांची सांगता होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक उत्तमजी घोलप करणार आहेत. या सुवर्ण क्षणाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या सहभागी होण्याचे आवाहन डॉ.संतोषजी जाधव, भाऊ पावडे, कुंडलिक वाफारे, कृष्णा ढोमे, दिलीप घुले, जबा जर्हाड, जनार्दन उंडे, वैभव शेळके, सचिन वाफारे, अक्षय मगर, पै.शुभम वाफारे, अमोल डोंगरे, मनोज कवडे, प्रशांत ठुबे, गणेश गुंड, प्रदीप म्हस्के, संदीप झावरे आदींनी केले आहे.