spot_img
अहमदनगरसंदीप थोरातसह टोळीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश!, ‘नगर सह्याद्री‌’च्या पाठपुराव्याला यश

संदीप थोरातसह टोळीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश!, ‘नगर सह्याद्री‌’च्या पाठपुराव्याला यश

spot_img

‌‘नगर सह्याद्री‌’च्या पाठपुराव्याला यश | पोलीस अधीक्षक राकेश ओला अन्‌‍ अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिले आदेश | शेवगाव पोलिसांचे कानावर हात

शिवाजी शिर्के | नगर सह्याद्री
पतसंस्था, बँकांप्रमाणे आर्थिक व्यवहार करण्याचा कोणताही परवाना नसताना ठेवीदार, गुंतवणुकदारांना अमिषे दाखवून कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या संदीप सुधाकर थोरात व त्याच्या अन्य पाच सहकाऱ्यांच्या विरोधात शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे यांनी आज दिले. संदीप थोरात व त्याच्या टोळीचा पर्दाफाश करणारी मालिकाच ‌‘नगर सह्याद्री‌’ने प्रकाशित केली होती. संदीप थोरात व त्याच्या टोळीने कशी आणि कोणाची आर्थिक फसवणूक केली याचा भांडाफोड करण्यात आल्यानंतर शेवगावमधील गुंतवणुकदारांनी संदीप थोरात याच्यासह त्याचा मेहुणा नवनाथ लांडगे, सचिन सुधाकर शेलार, दिलीप तात्याभाऊ कोरडे, दिपक रावसाहेब कराळे आणि क्लासीकब्रीज कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल सिताराम खरात यांच्याबाबत लेखी निवेदन दिले. संदीप थोरात व सहकाऱ्यांनी कटकारस्थान रचून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आलेल्या अर्जावर डीवायएसपी कार्यालयाने अहवाल सादर केला. त्या अहवालानुसार अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. दरम्यान, याबाबत सातत्यपूर्ण आणि अभ्यासपुर्ण लिखाण करत संदीप थोरात व त्याच्या टोळीचा भांडाफोड केल्याबद्दल फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी ‌‘नगर सह्याद्री‌’चे आभार मानले.

‌‘बीव्हीजी‌’ च्या हनुमंत गायकवाड यांनाही काढले वेड्यात!
सह्याद्री मल्टिनिधी कंपनीच्या माध्यमातून सुसाट सुटलेल्या संदीप थोरात याने त्याच्या पत्नीच्या माध्यमातून माहेर ही कंपनी सुरू केली. त्यात काही महिलांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. नगरमध्ये आपण महिला आणि मुलींसाठी काहीतरी वेगळे करत असल्याचे प्रझेंटेशन संदीप थोरात याने पुण्यात जाऊन बीव्हीजी कंपनीच्या हनुमंत गायकवाड यांना दिले. हे सारे पाहून ते प्रभावीत झाले आणि त्यांनी नगरमध्ये येऊन या भामट्या संदीप थोरातचे कौतुक केले.

वरिष्ठांचे आदेश फाट्यावर मारणाऱ्या शेवगाव पोलिसांची भूमिका संशयास्पद
वरिष्ठांनी आदेश देवूनही याबाबत शेवगाव पोलिस ठाण्याचे प्रमुख समाधान नांगरे यांनी कानावर हात ठेवल्याचे समोर आले आहे. गुंतवणुकदार पोलिस ठाण्यात गेले असता त्यांना असा आदेश हातात आला नसल्याचे त्यांनी सांगितले. संदिप थोरात याच्याविरोधात यापूवही गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यावेळी देखील शेवगाव पोलिसांनी संदिप थोरातबरोबर सेटींग केली आणि गुन्हा दाखल करणे टाळले. आता देखील शेवगाव पोलिस वरिष्ठांचा आदेश फाट्यावर मारून गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ करत आहेत काय? अशी शंका उपस्थित होत आहे.

‌‘माहेर‌’ च्या नावाखाली शेकडो महिलांना गंडा
संदीप थोरात याच्या पत्नीचे माहेर ब्युटी पार्लर कंपनी कायद्याखाली नोंदणी असताना अपभ्रंश करून सहकारी तत्त्वावर असल्याचे दाखवले गेले. पत्नीच्या माहेर या कंपनीत संदीप थोरात हा संचालक! त्याने सुरुवातीला जवळपास 100 महिलांकडून त्यासाठी प्रत्येकी दहा हजार रुपये जमा केले. यासाठी नगरमधील काही महिला वकिलांना त्याने निमंत्रीत करत त्यांचा सत्कार देखील केला. त्यातून त्याने महिलांना गुंतवणुकीवर लाभांश मिळेल असे आमिष दाखवले. गुंतवणूक केलेल्या अनेक महिलांना त्यांचे पैसे परत मिळाले नसल्याचेही समोर आले आहे.

जीएसटी बोगस टीमसाठी विकास काळेचे वाहन! त्यालाही आरोपी करण्याची मागणी
शेवगावमधील गुंतवणुकदारांना गंडा घालत तेथील सर्व कागदपत्रे पळवून आणण्यासाठी जीएसटी अधिकाऱ्यांची बोगस टिम संदीपने तयार केली. संदीप थोरात याच्या पंटरांनी खासगी वाहनाला जीएसटी कार्यालयाचे स्टीकर लावून अत्यंत पद्धतशिरपणे राबविलेला हा फंडा होता. सर्व साहित्य ज्या गाडीत भरुन नेण्यात आले ते वाहन (एमएच 16 बीवाय 9270) इनोव्हा क्रीस्टा विकास गबाजी काळे, रा. म्हसोबा चौक, नेप्तीरोड, नगर या व्यक्तीचे आहे. त्या वाहनाचा अथवा वाहन मालकाचा जीएसटी कार्यालयाशी काहीच संबंध नव्हता आणि नाही. माहिती अधिकारात आम्ही मिळविलेल्या माहितीनुसार या वाहनाची प्रभम नोंदणी किशोर नामदेव यादव यांच्या नावे झाली. त्यानंतर त्यांनी हे वाहन मंगेश शहाजी कारखिले यांना विकले. त्यांनी हे वाहन विकास काळे यांना विकले. विकास काळे याने संदीप थोरात याला हे वाहन शेवगावमधील कारनाम्यासाठी दिले. याचाच अर्थ या संपूर्ण प्रकरणात विकास काळे हा देखील आरोपी आहे. जीएसटी अधिकारी असल्याचे भासविणाऱ्या टीममध्ये कोण- कोण होते आणि त्यांनी शासनाच्या नावाचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची गरज आहे. शेवगाव पोलिस या अनुषंगाने तपास करतात किंवा कसे हे आता पहावे लागणार आहे.

सह्याद्री मल्टिनिधी अन्‌‍ विनायक मेटे यांचे कनेक्शन!
सह्याद्री मल्टिनीधी कंपनीच्या माध्यमातून पुरस्कार देणारा संदीप थोरात हा भलताच बोलबच्चन अन्‌‍ बोलघेवडा! शिवसंग्रामचे नेते स्व. विनायक मेटे यांचे संदीप थोरात याच्याकडे नेहमी येणेजाणे होते. विनायक मेटे यांना त्याने सह्याद्रीमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले होते. सह्याद्रीमध्ये संदीप थोरातसोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून खासगीत मिळालेल्या माहितीनुसार विनायक मेटे यांनी या संस्थेत जास्तीचा परतावा मिळतोय हे पाहून मोठी गुंतवणूक केली होती. मात्र, विनायक मेटे यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी गुंतवणूक केलेल्या पैशांची विल्हेवाट संदीप थोरात याने लावल्याची चर्चा आता झडू लागली आहे.

सह्याद्री मल्टिनिधीत फसवणूक झालेले गुंतवणूकदार भेटणार एसपींना!
क्लासीक ब्रीज कंपनीच्या आधी संदीप थोरात व त्याच्या टोळीने सह्याद्री मल्टिनिधी ही कंपनी कायद्याखाली नोंदणीकृत झालेल्या कंपनीच्या माध्यमातून नगर शहरासह नगर तालुका आणि संपूर्ण जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांना गंडा घातला. यासाठी वाळकी येथील मामा भालसिंग याची मदत त्याने घेतली. ही कंपनी असताना पतसंस्था असल्याचे भासवून जास्त परतावा देण्याच्या नावाखाली त्याने अनेकांना गंडा घातला. ही संस्था बंद पडून चार वर्षे लोटली असली तरी गुंतवणूकदारांना छदाम देखील मिळालेला नाही. गुंतवणूकदारांना वायदे देत संदीप थोरात याने वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाखाली गुंतवणूकदारांना टोप्या घातल्या असल्या तरी सह्याद्रीमधील कोणालाही त्याने परतावा दिलेला नाही. आज- उद्या आपले पैसे मिळतील अशी त्यांची अपेक्षा होती आणि संदीप थोरातही त्यांना तेच सांगता होता. आता त्याच्यावर क्लासीकच्या नावाखाली गंडविल्याचा गुन्हा दाखल होताच सह्याद्रीमधील गुंतवणूकदारांनी थेट पोलिस अधीक्षकांचे कार्यालय गाठण्याचा निर्णय घेतला असल्याचे समोर आले आहे.

संदीपचा मेहुणा नवनाथ लांडगे हाही झाला सहभागी!
संदीपच्या गँगमध्ये अनेकजण सहभागी झाले होते. त्यांची नावे आता समोर येऊ लागली आहेत. नवनाथ लांडगे हा त्यातीलच एक. नवनाथ हा संदीप थोरात याचा मेहुणा! बायकोचा भाऊ! नवनाथ लांडगे हा शेवगावमधील गुंतवणूकदारांना भेटण्यात, त्यांच्याकडून पैसे घेण्यात अग्रभागी होता. आता आरोपींच्या यादीत संदीपच्या जोडीने नवनाथ थोरात याचे देखील नाव आले असल्याने संदीप थोरात याने मोठी नातेवाईकांना सोबत घेत गंडा घालणारी मोठी गँगच तयार केल्याचे समोर आले आहे.

संदीप थोरात व टोळीविरोधात मकोका लावण्याबाबत तपासणी!
संदीप थोरात आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अनेकांना गंडा घातल्याचे अर्ज समोर येत आहेत. शेवगाव पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता त्यानुसार गुन्हा देखील झाला आहे. या टोळीने वेेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाखाली गुंतवणुकदारांसह बेरोजगार तरुणांना आणि महिलांना देखील गंडविल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणात गुन्हा दाखल झाला असला तरी या सर्वांच्या विरोधात संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार (मकोका) गुन्हा दाखल करण्याबाबत कायदेशिर तपासणी चालू आहे.
– राकेश ओला,
पोलिस अधीक्षक, अहिल्यानगर

पारनेरमधील गुंतवणूकदारांना गंडा घातला, अर्जावर निर्णय कधी होणार?
पारनेरमधील गुंतवणुकदारांना संदीप थोरात व त्याच्या टोळीने मोठ्या प्रमाणात गंडा घातला. याबाबत तक्रारी अर्जही करण्यात आले. मात्र, या अर्जांवर उपअधीक्षक असणाऱ्या संपत भोसले यांना निर्णय घ्यायला वेळ मिळत नसल्याचे समोर आले आहे. अशाच एका दुसऱ्या कंपनीच्या सुपा येथील उद्घाटनाला हेच भोसले साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्याकडून आलेल्या अर्जांवर निर्णय न होण्यामागे नक्कीच काहीतरी कनेक्शन असल्याची चर्चा आता झडू लागली आहे.

‌‘माहेर‌’चा पदवीदान समारंभ! गुंतवणुकीचे काय?
माहेर पार्लरच्या माध्यमातून महिलांना ब्युटीशिअन संबंधीत प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण झालेल्या महिला- मुलींसाठीचे पदवीदान समारंभ नुकताच संदीप थोरात आणि त्याच्या पत्नीने घेतला. मात्र, माहेर या कंपनीत गुंतवणूक केलेल्या महिलांचे प्रत्येकी दहा हजार रुपये आजही अनेक महिलांना मिळालेले नाहीत. आता या महिला देखील पोलिस अधीक्षकांच्या भेट घेण्याच्या तयारीत आहेत.

फसवणूक झालेल्यांनी पुढे यावे, पोलीस सहकार्य करतील!
कंपनी कायद्याखाली नोंदणी झालेल्यांना कोणत्याही प्रकारच्या ठेवी अथवा रकमा स्वीकारता येत नाही. मात्र, तरी देखील त्यांनी तो प्रयत्न केला आणि त्यातून अनेकांचे पैसे लुबाडल्याचाच प्रकार आता समोर आला आहे. संदीप थोरातसह अनेकांकडून यात गैरप्रकार झाल्याचेही समोर आले आहे. यानिमित्ताने सखोल चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचा आदेश शेवगाव पोलिसांना देण्यात आला आहे. त्यानुसार शेवगाव पोलिस योग्य ती कार्यवाही करतील आणि आरोपींना अटक करतील. फसवणुक झालेल्यांनी समोर येण्याची आणि तक्रार देण्याची हिम्मत करावी. पोलिस त्यांना नक्कीच न्याय देतील.
– प्रशांत खैरे, अप्पर पोलिस अधीक्षक, अहिल्यानगर

गोरगरिबांचे पैसे बायकोच्या ‌‘माहेर‌’मध्ये गुंतवले!
संदीप थोरात याने सह्याद्री मल्टीनिधी कंपनीच्या विविध 19 शाखा दाखवल्या. त्या माध्यमातून नगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून त्याने मोठ्या प्रमाणात पैसे जमा केले. जमा झालेल्या या पैशातून संदीप थोरात याने त्याच्या पत्नीच्या नावे माहेर ही वेगळी कंपनी स्थापन केली. ब्युटी पार्लरच्या नावाखाली ही कंपनी कार्यरत असल्याचे दाखवले. या कंपनीचे अत्यंत प्रशस्त असे ब्युट पार्लरही सुरू करण्यात आले. त्यासाठी संदीप थोरात याने सह्याद्री मल्टीनिधीतील सुमारे चाळीस लाख रुपये पार्लरच्या उभारणीत घातल्याची बाबही समोर आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जी. एस. महानगर बँक निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार, मोठी माहिती समोर..

पारनेर | नगर सह्याद्री जी एस महानगर बँकेची निवडणूक लवकरच होणार असून यासाठी मतदारांची नवीन...

मनपाचे 1680 कोटींचे बजेट मंजूर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर महानगरपालिकेचा सन 2024-2025 चा सुधारीत व सन 2025-2026 चा मूळ...

स्मशानभूमी परिसरात थाटला ‘ऑक्सिजन पार्क‌‌‌’; नगर जिल्ह्यातील ‘या’ गावाची चर्चा!

वृक्षप्रेमी रसाळ बंधु यांचे कार्य कौतुकास्पद: आमदार काशिनाथ दाते पारनेर । नगर सहयाद्री:- निसर्गाच्या सान्निध्यात वृक्ष...

भैय्या! सुरुवात करतोय, आशीर्वाद असू द्या; किरण काळे पुन्हा शिवसेना मजबूत करणार

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- शिवसेनेचे दिवंगत नेते माजी मंत्री अनिल भैय्या राठोड यांनी आयरनजर शहरांमध्ये...