spot_img
महाराष्ट्रपाण्याअभावी फळबागा संकटात; श्रीगोंद्यातील शेतकरी हवालदिल

पाण्याअभावी फळबागा संकटात; श्रीगोंद्यातील शेतकरी हवालदिल

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कुकडीच्या आवर्तनावर मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड केली होती. परंतु मोठ्या मेहनतीने सांभाळलेल्या फळबागा पाण्याअभावी डोळ्यासमोर जळू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मोसंबी, द्राक्ष, डाळींब, केळी, संत्री आदी फळे गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर घेण्यात येतात. पाण्याविना या फळबागा जळाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

मशागतीसाठी केलेला खर्च निघाला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कुकडीचे पाणी वेळेत न आल्याने अनेक वर्षांपासून फळबागा जपलेल्या जळून चालल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांचा ऊस करपून गेला आहे. तर पाण्याअभावी कलिंगड अर्ध्यावर सोडून द्यावे लागले असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. दरम्यान शेतकऱ्यांचे हाल होत असताना दुसरीकडे लोकप्रतिनिधींकडून काही उपाययोजना केल्या जात नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

श्रीगोंदा तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी दमदार पाऊसच झाला नसल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. परिसरातील ओढे, नाले, तलाव, कोरडे पडले असून पिण्याच्या पाण्यासाठी तालुक्यातील काही गावामध्ये ग्रामस्थांना टँकरची वाट पाहावी लागत आहे. शेतकऱ्यांना फळबागा जगवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे विदारक चित्र श्रीगोंदा तालुक्यात दिसत आहे.

५ हजार लिटरच्या टॅंकरसाठी ३ हजार
सध्या पाच हजार लिटरच्या लहान टॅंकर साठी २ ते ३ हजार रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागत आहे. या पाण्यावर कशी तरी २००-३०० झाडे जगवता येत आहेत. तसेच तीव्र उन्हाळामुळे पाच ते सहा दिवसांनी पुन्हा पाणी द्यावे लागत असल्याने शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. फळबागा जगण्यासाठी पाणी विकत घेताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने बागा जगवणे अवघड झाले आहे.

कुकडीचे आवर्तन सोडण्याची मागणी
कशी करावी शेती ,पाणी मिळत नाही, मशागतीचा खर्चही निघत नाही, कुकडीचे आवर्तन वेळेवर सोडत नाहीत, सध्या पाणी नसल्याने फळबागा जळू लागल्या आहेत. फळबागा जगविण्यासाठी २ ते ३ हजार रुपये टँकरला मोजावे लागत आहेत. बागा जगविण्यासाठी शासनाने मदत करावी. कुकडी कॅनल चे आवर्तन सोडावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा प्रभाग रचनेबाबत महत्वाचे आदेश प्राप्त; सप्टेंबरला अंतिम प्रभाग रचना, असा आहे कार्यक्रम

सुनील चोभे | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश नगर विकास विभागाने...

‌‘सेनापती बापट‌’ मध्ये गैरव्यवहार! चेअरमनसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल

पारनेर | नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील 75 वषय शेतकरी आणि विमा...

नगर, श्रीगोंदा, शेवगाव,पाथर्डीत तुफान वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

पिकांचे नुकसान | शेड, घराची पत्रे उडाली | जेऊर, चिचोंडी पाटील, खडकीत नुकसान अहिल्यानगर...

‌‘रयत‌’चे विध्यार्थी गिरवणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे धडे: चेअरमन चंद्रकांत दळवी

कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत शिक्षण देणारी राज्यातील पहिली शिक्षण संस्था ‌‘रयत‌’ ठरणार अहिल्यानगर | नगर सह्याद्री आर्टिफिशियल...