spot_img
अहमदनगरप्रशासनाला विरोध! शिक्षक नेते निलंबित; नेमकं प्रकरण काय?

प्रशासनाला विरोध! शिक्षक नेते निलंबित; नेमकं प्रकरण काय?

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणारे शिक्षक नेते राजेंद्र निमसे यांच्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. निमसे हे नगर तालुक्यातील निंबळक जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक होते. याबाबतचे आदेश जिल्हा परिषद शिक्षण विभागाने काढले असून निलंबनाच्या काळात निमसे यांचे मुख्यालय आता कोपरगाव तालुका करण्यात आले आहे.

शिक्षक नेते निमसे यांची नेमणूक असणारी नगर तालुक्यातील निंबळकची शाळा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी तपासली होती. यावेळी शिक्षक निमसे हे शाळेत वारंवार गैरहजर असल्यासोबत त्यांच्या अख्यारित येणार्‍या वर्गात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुमार असल्यासोबत संकलित मुल्यमापन चाचणी प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना सोडवता आली.

यावरून संबंधीत शिक्षक नेत्याचे आपल्या शाळेकडे आणि वर्गाकडे दुर्लक्ष झाल्याचे समोर आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश शनिवारी नगर तालुका गटशिक्षण विभागाला पाठवण्यात आले असून निमसे यांना निलंबीत करून निलंबन काळात त्यांचे मुख्यालय हे कोपरगाव करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद प्रशासन आणि शिक्षण विभागाकडून घेण्यात येणार्‍या शैक्षणिक निर्णयास विरोध करणे निमसे यांच्या महागात पडले आहे. यामुळे त्यांच्या शाळेची गुणवत्ता तपासून त्यानूसार कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रशासनाच्या चांगल्या बाबींना विरोध करणे निमसे यांना महागात पडल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भाजप-राष्ट्रवादीचं ठरलं!, महापालिका निवडणुकीत युती; एमआयएमही उतरणार मैदानात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना आता...

नेपाळमध्ये राडा! आंदोलकांनी संसद पेटवली, पंतप्रधानांचा राजीनामा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमधील परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. निदर्शनांनी हिंसक...

चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे शुक्रवारी भूमिपूजन; आमदार कर्डिले यांची माहिती, कोण कोण राहणार उपस्थिती?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे भूमिपूजन येत्या शुक्रवार दिनांक 12...

विसर्जन मिरवणुकीत युवकाचा खून; कुठे घडली घटना?

सांगली । नगर सहयाद्री:- मिरज तालुक्यातील अंकली गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांमध्ये सुरू...