पारनेर | नगर सह्याद्री
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दि. 2 ऑक्टोबरला दसरा मेळाव्याचे निमित्ताने पारनेर दौऱ्यावर येत असल्याचे समजताच त्यांच्या नियोजित दौऱ्याला अजित पवार – गो – बॅक आंदोलनाने विरोध करण्याचा इशारा पारनेर कारखाना बचाव समिती व भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने दिला आहे.
भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर व लोक जागृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामदास घावटे यांची व सामाजिक संघटनांची पारनेर येथे बैठक झाली. याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील देवीभोयरे येथील सहकारी साखर कारखाना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने बेकायदा विक्री केल्या प्रकरणी पारनेर न्यायालयाच्या आदेशानंतर बँकेचे दोन अधिकारी व पुण्याच्या क्रांती शुगर या खाजगी कंपणी विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतचा तपास सध्या चालु आहे. क्रांती शुगर हि खाजगी कंपणी असुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवतयांची असल्याने या प्रकरणी पारनेरकरांवरील झालेला अन्याय दुर करण्याचे आश्वासन गत वष निवडणुकांचे वेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी पारनेरकरांना दिले होते.
कारखाना बचाव समितीने पारनेर तहसिलदार व पोलिसांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, गत वष दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करणे कामी कारखाना बचाव समितीने त्यांच्या पक्षाचे पारनेरचे विधानसभा सदस्य काशिनाथ दाते व पक्षाचे पदाधिकारी यांना वर्षभर वारंवार भेटून दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेची मागणी केलेली होती. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत कोणताही निर्णय अद्याप पर्यंत घेतलेला नाही.
यावेळी उपस्थित भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर लोकजागृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामदास घावटे यांच्यासह साहेबराव मोरे, मनोज तामखडे, संतोष वाबळे, रामदास सालके, प्रवीण खोडदे, वसंत साठे, सुभाष करंजुले, गोरक्ष पठारे, अन्सार पटेल, रघुनाथ मांडगे, राहुल गुंड, प्रशांत औटी, सोमनाथ गोपाळे, अनिल सोबले, संभाजी सालके, अंकुश कोल्हे, रामदास सालके, गोविंद बडवे, बाबाजी वाढवणे, ज्ञानेश्वर काळे, महेंद्र पांढरकर, अरुण बेलकर, जालिंदर लंके आदी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी पारनेर विश्रामगृहावर झालेल्या बैठकी प्रसंगी उपस्थित होते.
तसेच व सध्या तालुक्यात सर्व दूर होत असलेल्या पावसामुळे शेती पिकांचे झालेले नुकसान शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी तसेच कांद्याच्या बाजारभाव वाढीसाठी कोणताही ठोस निर्णय नाही. यासंदर्भात भूमिपुत्र शेतकरी संघटना व पारनेर कारखाना बचाव समिती आक्रमक झाली आहे. तसेच कारखाना बचाव समितीने शासनाला दिलेल्या कारखाना पुनजवनाच्या प्रस्तावावर देखील कोणताही निर्णय घेतलेला नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दावर विश्वास ठेवून पारनेरकरांनी त्यांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार यांना विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी केलेले होते. परंतु त्यानंतर आम्हाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे या प्रकरणी त्यांचे लक्ष वेधण्याकरिता पारनेर साखर कारखाना बचाव समितीने त्यांच्या नियोजित पारनेर दौऱ्यावेळी अजित पवार – गो बॅक, अजित पवार – परत जा असे आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे आंदोलन आमच्या मागण्यांचे बाबत लक्ष वेधण्याकरता करण्यात येणार असल्याची माहिती संघटनांच्या वतीने देण्यात आली.