spot_img
देशऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार...., पाकने कुरापती केल्यास शांत बसणार नाही ; राजनाथ...

ऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार…., पाकने कुरापती केल्यास शांत बसणार नाही ; राजनाथ सिंह यांनी पाकला ठणकावले, काय म्हणाले पहा

spot_img

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. या मोहिमेची माहिती दिली. तसेच ऑपरेशन सिंदूर संपलेले नसून जर पाकिस्तानने आगळीक केली, तर भारताकडून पुन्हा उत्तर दिले जाईल, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. तसेच ऑपरेशन सिंदूरमध्ये जवळपास १०० अतिरेकी मारले गेल्याचीही माहिती त्यांनी दिली. ऑपरेशन सिंदूर सुरू असल्यामुळे मृतांचा नेमका आकडा देण्यात आलेला नाही.

१०० अतिरेकी मारले गेले
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत ऑपरेशन सिंदूरच्या यशाची माहिती देताना म्हटले की, या एअर स्ट्राईकमध्ये जवळपास १०० अतिरेकी मारले गेले आहेत. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर मोहीम संवेदनशील असल्यामुळे याव्यतिरिक्त केंद्र सरकारकडून जादा माहिती दिलेली नाही.

राजनाथ सिंह या बैठकीत म्हणाले की, भारताला परिस्थिती आणखी चिघळायची नाही. पण जर पाकिस्तानने काही आगळीक केल्यास भारत शांत बसणार नाही. या बैठकीला राजनाथ सिंह यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि इतर काही मंत्री उपस्थित होते. तसेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार मल्लिकार्जुन खरगेंनीही बैठकीला हजेरी लावली होती.

तत्पूर्वी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या कारवाईला आपले समर्थन दिले. तसेच ऑपरेशन सिंदूर राबविल्यानंतर सर्व पक्षीय बैठक बोलावून सर्व विरोधकांना विश्वासात घेतल्याबद्दलही त्यांनी केंद्र सरकारचे कौतुक केले.

पंतप्रधान मोदी या बैठकीला गैरहजर राहिल्याबद्दलचा प्रश्न काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विचारला. ते म्हणाले, पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने बोलावलेल्या पहिल्या बैठकीलाही पंतप्रधान उपस्थित नव्हते. जर ते स्वतःला संसदेपेक्षा वरचढ समजत असतील तर काही हरकत नाही. याबद्दल त्यांना नंतर विचारणा करू. पण या संकटाच्या काळात आम्ही कुणावरही टीका करू इच्छित नाही.

सर्वपक्षीय बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकारतर्फे माध्यमांना निवेदन देताना म्हटले की, सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सौहार्दपूर्ण पद्धतीने पार पडली. सर्व नेत्यांनी परिपक्वता दाखवत कोणतीही टीका-टिप्पणी केली नाही. ही बैठक एका व्यापक राजकीय हेतून घेतली गेली होती, जिचा उद्देश सफल झाला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

गुड न्यूज! 13 मे पर्यंत मान्सून अंदमनात धडकणार

मुंबई | नगर सह्याद्री मान्सूनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. यावष मान्सून लवकरच दाखल होणार...

‘अहिल्यानगरमध्ये ‘या’ तारखेपासून पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- प्रबोधन, उद्बोधन, समुपदेशन व परिवर्तन या चतु:सूत्रीवर राष्ट्रभक्ती जागवण्याच्या उद्देशाने काम...

राजकारणात पुन्हा भूकंप होणार?, शरद पवार भाकरी फिरवणार? राष्ट्रवादी एकत्र…

Maharashtra Politics News: पक्षातील काही नेते आणि कार्यकर्ते अजित पवार यांच्यसोबत जाण्यास उत्सुक आहेत....

जिल्हा रुग्णालयातुन पळालेला आरोपीला जेरबंद; ‘असा’ लावला सापळा

अहिल्यानगर । नगर सहयाद्री जिल्हा रुग्णालयातुन पळालेला आरोपीला बेड्या ठोकण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला...