spot_img
अहमदनगरजिंकून येणार्‍यालाच मिळणार तिकिट! आमदारांच्या बैठकीत फडणवीस काय-काय म्हणाले? वाचा सविस्तर ..

जिंकून येणार्‍यालाच मिळणार तिकिट! आमदारांच्या बैठकीत फडणवीस काय-काय म्हणाले? वाचा सविस्तर ..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी बैठकांचा धडाका लावला आहे. सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विभागानुसार भाजप आमदारांच्या बैठका घेत असल्याचं चित्र दिसत आहे. गुरूवारी रात्री फडणवीसांनी पश्चिम महाराष्ट्रातील भाजप आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आमदारांना विधानसभेचा कानमंत्र दिला. तसेच जिंकून येणार्‍या आमदारालाच तिकिट देणार असल्याचे सांगितल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची धाकधूक वाढली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी रात्री पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली आहे. प्रलंबित विकासकामे लवकर मार्गी लावण्यास मी स्वतः मदत करेल असेही त्यांनी आमदारांना सांगितले आहे. लोकसभेत ज्या ज्या मुद्यांवर फटका बसला, त्याचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला आहे.

मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, याबरोबरच शेतमालाचा भाव यावरही आमदारांसोबच फडणवीसांनी चर्चा केली आहे. लाडकी बहिण, युवा प्रशिक्षण या योजना प्रत्येक गावात पोहोचवा. महायुतीच्या स्थानिक सर्व पदाधिकार्‍यांना सोबत घेऊन काम करा अशा सूचना फडणवीस यांनी यावेळी दिल्या आहेत. तसेच जिंकून येणार्‍या आमदारालाच तिकिट देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यामुळे आता आमदारांची धाकधूक वाढली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राष्ट्रवादीचे धक्का तंत्र; निवडणुकीचा सूर बदलला!, बारामती पॅटर्नची झलक दिसणार?

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा नगरपरिषदेच्या निवडणुकीला आता रंग चढला आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबाबत...

‘जलसंपदा विभागाला बेस्ट स्टेट कॅटेगरी प्रथम पुरस्कार’

राहाता । नगर सहयाद्री:- केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने राज्याच्या जलसंपदा विभागाला बेस्ट स्टेट कॅटेगरी २०२४...

लाडक्या बहिणींना दिलासा! पती व वडील हयात नसलेल्या महिलांनाही KYC करता येणार, वाचा प्रोसेस..

मुंबई | नगर सहयाद्री:- लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी प्रक्रियेबाबत राज्य सरकारकडून एक महत्त्वाचा दिलासा...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींना शुभ ‘गुरुवार’

मुंबई । नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य मुलांमुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील. रटाळ कंटाळवाण्या, त्रासदायक दिवसाचा...