spot_img
अहमदनगरअवघे शहर भगवेमय! शिवजयंती निमित्त ठिकठिकाणी शिवरायांना अभिवादन

अवघे शहर भगवेमय! शिवजयंती निमित्त ठिकठिकाणी शिवरायांना अभिवादन

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी (दि.२८) माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपतींच्या आश्वरूढ पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. ढोल ताशा, लेझीम या पारंपरिक वाद्यांनी परिसर दणाणून गेला होता. शहरात चौका-चौकात शिवजयंतीचे व्यासपीठ लागले होते. तर, सर्वत्र भगवे ध्वज लागल्याने वातावरण भगवेमय झाले होते.

शहरासह केडगाव उपनगर, भिंगार, ग्रामीण भागातही सकाळपासून विविध तरुण मंडळांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती. चौका-चौकात स्टेज उभारून जयंती साजरी करण्यात आली. अनेक मंडळांनी आकर्षक देखावे उभारले होते. पोवाडे, गीते अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल होती.

शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. स्वस्तिक चौक येथील जनजागृती मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने सिंहासनावर विराजमान शिवाजी महाराजांच्या भव्य पूर्ण कृती पुतळ्यास खासदार डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जय भवानी… जय शिवाजी… च्या घोषणांनी परिसर दणाणला.

प्रारंभी जुने बस स्थानक येथील शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, बाबुशेठ टायरवाले, शहर प्रमुख दिलीप सातपुते, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे, आकाश कातोरे, माजी महापौर शिलाताई शिंदे, नगरसेविका अश्विनी जाधव, शहराध्यक्ष ड. पुष्पा येळवंडे, सलोनी शिंदे, तृप्ती साळवे, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हाप्रमुख ओंकार शिंदे, आशिष (मुन्ना) शिंदे, अमोल हुंबे, पोपटराव पाथरे, आनंद शेळके, पवन कुमटकर, विजय चव्हाण आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नगर-पुणे महामार्गावरील स्वस्तिक चौकात अभिवादनसाठी ठेवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा सर्वांचे लक्ष वेधले. नागरिकांसह युवक-युवती पुतळ्याबरोबर छायाचित्र घेण्यास गर्दी केली होती.

शहर शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने माळीवाडा शाखा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आ.निलेश लंके, शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, सुरेखा कदम, युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, संजय शेंडगे, आशा निंबाळकर, अरुणा गोयल, बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, शाम नळकांडे, दत्ता जाधव, परेश लोखंडे, संतोष गेनप्पा, सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड, दिपक खैरे, संग्राम कोतकर, बबलू शिंदे, संदिप दातरंगे, अशोक दहिफळे, बंटी खैरे, अण्णा घोलप, दिपक भोसले, मिलनसिंग जुनी, नितीन भुतारे, संतोष डमाळे, गिरिष हंडे आदि उपस्थित होते. भाजपाच्यावतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली

आ. लंके – खा. विखे यांची लगबग
शिवजयंती निमित्त नगर शहरासह विविध भागातील मंडळांना भेटी देण्यासाठी आ. नीलेश व खा. सुजय विखे यांची लगबग पाहायला मिळाली. कधी समोरासमोर तर वेगवेगळ्या ठिकाणी या भेटी देण्याचे काम दोघांकडूनही सुरु होती. शिवरायांना अभिवादन हा एक भाग असला तरी हा राजकीय जुगलबंदीचा एक भाग असल्याचे लोक म्हणतात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणारा गोल्डन गेटचा पर्दाफाश!, वाचा नगर क्राईम

​अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या रकमेवर अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी...

शिवसेनेच्या शुभांगी पोटे यांचा सार्‍यांनीच घेतला धसका; काय काय घडलं पहा

आप्पा चव्हाण | नगर सह्याद्री जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेल्या श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीमध्ये शेवटच्या टप्प्यात शिवसेना...

कानठळ्या बसविणारे सायलेन्सर पोलिसांनी चालविला रोडरोलर, नेमकं काय केले पहा

पोलिसांनी १३० मॉडिफाइड सायलेन्सरवर चालविला रोडरोलर अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोतवाली, तोफखाना व भिंगार कॅम्प...

लोणीतील सराफ दुकानात जबरी चोरी; कुख्यात गुंडाची टोळी 12 तासांत जेरबंद

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- लोणी येथील अजय ज्वेलर्स दुकानात झालेल्या जबरी चोरीचा गुन्हा केवळ...