मुंबई । नगर सहयाद्री:-
डिजिटलच्या युगात सर्व ऑनलाइन झाले आहे. पेट्रोल भरल्यानंतरही आपण ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करतो. परंतु आता तुम्ही कोणत्याही पेट्रोल पंपावर ऑनलाइन पेमेंट करु शकणार नाही. महाराष्ट्रातील अनेक पेट्रोल पंपावर सायबर फसवणुकीचे प्रकार घडले आहे.
पेट्रोल पंप चालकांच्या संघटनांनी याबाबत माहिती दिली. यामुळे १० मे पासून ऑनलाइन पेट्रोल पेमेंट घेणे थांबवण्यात आले आहे. हा निर्णय महाराष्ट्रात घेण्यात आला आहे. विदर्भ, नाशिकमध्ये तुम्ही ऑनलाइन पेमेंट करु शकणार नाहीत.
अनेक वेळा लोक इतरांचे कार्ड वापरुन किंवा नेटबँकिंग करुन निघून जातात. यानंतर तक्रार करतात आणि व्यव्हार रद्द करतात. यामुळे पेट्रोल पंप मालकांने खूप नुकसान झाले आहे. यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.
या घटनांमुळे पेट्रोल पंपाचे बँक खातेदेखील ब्लॉक करण्यात आले आहे. यानंतर खाती ब्लॉक झाल्यावर व्यव्हारदेखील होत नाही. यामुळे विदर्भ आणि नाशिक पेट्रोल पंप डीलर्सने पुढाकार घेत हा निर्णय घेण्यात आला आहे.