रांधेतील शेतकर्याने कांद्याला भाव नसल्याने पीक केले नष्ट
पारनेर | नगर सह्याद्री
गेल्या वर्षभरात कांद्याला सरकारने अत्यल्प भाव दिला आहे. त्यामुळे रांधे येथील युवा शेतकरी संतोष शिंदे यांनी भाव नाही म्हणून कांदा या पिकावर रोटर फिरवून ते नष्ट केले आहे.
याबाबत माहिती देताना युवा शेतकरी संतोष शिंदे यांनी सांगितले की किमान आता तरी भाव मिळेल या अपेक्षेने कांद्याचे हिवाळी पीक घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. मात्र चार ते पाच रुपये किलो भाव मिळत असेल तर कांदा उत्पादक शेतकर्यांनी करायचे तरी काय? याचा निषेध म्हणून आम्ही कांदा या पिकावर रोटर फिरवून सरकारचा निषेध केला आहे.
तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या कार्यकाळात कांद्याला चांगला भाव मिळत होता. तसेच सर्वाधिक कर्जमाफी करण्याचे काम पवार साहेब यांनी केले आहे. मात्र आजचे मोदी व फडणवीस सरकार शेतकर्यांचे शोषणकर्ते असून यांनी शेतकर्यांचे वाटोळे केले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करीत शेतकर्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याची प्रतिक्रिया शिंदे यांनी व्यक्त केली.



