spot_img
अहमदनगर'कांदा, दूधप्रश्नी खासदार लंके यांचा एल्गार'

‘कांदा, दूधप्रश्नी खासदार लंके यांचा एल्गार’

spot_img

महाविकास आघाडीच्यावतीने शुक्रवारी शेतकर्‍यांसह आंदोलन
पारनेर | नगर सह्याद्री
कांदा दूध प्रश्नावर खासदार नीलेश लंके चांगलेच आक्रमक झाले आहे. येत्या शुक्रवारी(दि.५) सकाळी १० वाजता शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी खासदार नीलेश लंके रस्त्यावरची लढई सुरू करणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकर्‍यांना सोबत घेत आंदोलन करणार आहेत. नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोर महाविकास आघाडीच्यावतीने शेतकरी जनआक्रोश आंदोलन करणार आहे.

सध्या कांदा व दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. शेतकर्‍याला न्याय देण्यासाठी खासदार नीलेश लंके यांनी आंदोलनाचे हत्यार उपासले आहे. कांद्याच्या व दुधाच्या भावात घसरण झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकर्‍याला कांदा उत्पादनासाठी लागणारा खर्च, आडत सगळ्याचा खर्च जाऊन शेतकर्‍याच्या हातात काही पैसे मिळणे अपेक्षित आहे. परंतु तसे होताना दिसत नाही. दुधाची ही तीच परिस्थिती असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

महाराष्ट्रात यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कांद्याचे घसरलेले दर हा मुद्दाही चांगलाच चर्चिला गेला. कांदा निर्यातबंदीवरून महाविकास आघाडीने सत्ताधारी महायुतीला घेरण्याचा प्रयत्न केला होता. नगर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार लंके यांनीही निवडणुकीदरम्यान कांदा आणि दूध दराचा प्रश्न उपस्थित करत मतदान प्रक्रिया संपताच १५ मे रोजी आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु आचारसंहितेमुळे ते रद्द करण्यात आले. आता येत्या ५ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर खासदार निलेश लंके हे कांदा व दूध प्रश्नावर आंदोलन करणार आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे...

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत ​अहिल्यानगर /...

​घोसपुरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दागिन्यांसह मोठा ऐवज लंपास

​अज्ञात चोरट्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; परिसरात भीतीचे वातावरण ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री...