spot_img
अहमदनगरसहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

spot_img

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद – शहाजी भोसले पाटील

श्रीगोंदा / नगर सह्याद्री –

सहकार महर्षी काष्टी सेवा सोसायटीत येत्या रविवारी ( दि.22) कांदा पिक परिसंवाद व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सहकार महर्षी काष्टी सोसायटीचे उपाध्यक्ष शहाजी भोसले पाटील यांनी दिली.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी व सहकार महर्षी काष्टी सोसायटी यांचे संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी सकाळी 10 वा. सहकार सभागृहात कांदा उत्पादक शेतक-यांसाठी ‘कांदा पिक परिसंवाद व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम’ आयोजित केला आहे.महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव अरुण आनंदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेचे अध्यक्ष राकेश पाचपुते यांचे अध्यक्षतेखाली हा परिसंवाद पार पडणार आहे.

या परिसंवादात राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तज्ञ शेतक-यांना मार्गदर्शन करणार आहेत. राहुरी विद्यापीठाचे उद्यानविद्या प्रमुख डाॅ.भरत पाटील यांचे ‘कांदा लागवड तंत्रज्ञान’ या विषयावर, रोग शास्त्रज्ञ डाॅ. चिमाजी बाचकर यांचे ‘कांदा पिकावरील रोग व किड व्यवस्थापन’ तसेच अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डाॅ.विक्रम कड यांचे ‘कांदा काढणी पश्चात तंत्रज्ञान व साठवणूक तंत्र’ या विषयावरील व्याख्याने होणार आहेत.

काष्टी परिसरासह श्रीगोंदा व शिरुर तालुक्यातील शेतकरी आता कांदा पिकाकडे वळला आहे.या शेतक-यांना शास्त्रशुध्द मार्गदर्शन व्हावे तसेच शेतक-यांचे एकरी उत्पादन वाढीसाठी या परिसंवाद व प्रशिक्षण कार्यक्रमाचा फायदा होणार आहे.परिसंवाद व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाला कांदा उत्पादक शेतक-यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष शहाजी भोसले पाटील, व्यवस्थापक नामदेव गावडे,सचिव गणेश पाचपुते व संचालक मंडळाने केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...