सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको
नाशिक | नगर सह्याद्री
गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल मागे जवळपास 2 हजार रुपयांनी भाव घसरले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत. कांद्याला चांगला भाव मिळावा यासाठी शेतकरी आक्रमक झाले असून लिलाव बंद पाडले आहेत. तसेच रास्तारोको आंदोलन करण्यात आले. नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. नाशिकच्या येवला बाजार समितीत छावा शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. मनमाड-येवला मार्गावर शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले.
कांद्यावर 20 टक्के शुल्क रद्द करावे, शेतकऱ्यांना 25 रुपये किलो अनुदान मिळावे, नाफेड आणि एनएफसीसीने प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी कांदा खरेदी भ्रष्ट्राचार झाल्याने त्याची चौकशी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहेत. या सर्व मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले.
नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने कांद्याला प्रति क्विंटल अनुदान द्यावं अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क देखील तातडीने हटवावं, अशी मागणी करत शेतकरी आक्रमक झाले आहेत.
अहिल्यानगरमध्ये कांद्याचे भाव गडगडले
मागील 10 दिवसांत क्विंटल मागे जवळपास 2 हजार रुपयांनी भाव घसरले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत. दरम्यान बाजार समिती संचालकांकडून कांद्याचे आवक वाढल्याचे कारण सांगितले जात आहे. हवामान बदलामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी आता पुन्हा कांद्याचे भाव कोसळल्याने अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.