spot_img
आर्थिकलॉन्च होतोय OnePlus चा 'हा' जबरदस्त फोन, जाणून घ्या कॅमेरा व इतर...

लॉन्च होतोय OnePlus चा ‘हा’ जबरदस्त फोन, जाणून घ्या कॅमेरा व इतर फीचर्स

spot_img

नगर सह्याद्री टीम
OnePlus 12 : वनप्लसने नुकतेच आपल्या आगामी OnePlus 12 स्मार्टफोनच्या काही महत्त्वाच्या वैशिष्ट्यांबाबत माहिती शेअर केली आहे. कंपनी उद्या अर्थात 9 नोव्हेंबर रोजी कॅमेरा परफॉर्मन्सबद्दल तपशील समोर आणेल असे वाटत आहे. या स्मार्टफोनच्या चिपसेटचे नाव आणि डिस्प्ले डिटेल्स आधीच जाहीर करण्यात आले आहेत. हा फोम बाजारात धुमाकूळ घालेल अशी कंपनीला अपेक्षा आहे.

असा असेल OnePlus 12 चा कॅमेरा
OnePlus 12 बद्दल लीक झालेल्या माहितीनुसार, फोनमध्ये शानदार झूम कॅमेरा असण्याची शक्यता आहे. प्रायमरी कॅमेरामध्ये ओआयएस सपोर्ट आणि एफ/1.7 अपर्चरसह 50 मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स 966 सेन्सर असेल. सध्याच्या वनप्लस 11 च्या 48 मेगापिक्सेल कॅमेऱ्याच्या तुलनेत हा कॅमेरा जबरदस्त अपग्रेड असेल. दुसरा कॅमेरा 48 मेगापिक्सलचा Sony IMX581 अल्ट्रावाइड कॅमेरा असेल, जो 120 डिग्री फिल्ड-ऑफ-व्ह्यू प्रदान करेल. तिसरा कॅमेरा 64 मेगापिक्सलचा 3x पेरिस्कोप टेलिफोटो शूटर असेल. फ्रंटमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा असेल.

OnePlus 12 चे असे असेल डिझाईन
चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीबोवर हा टीझर पाहायला मिळाला आहे. टीझरमध्ये फोनचा बॅक कॅमेरा वनप्लस 11 सारखाच असणार आहे. फोनमधील बेजल्स खूपच पातळ असतील. व्हॉल्यूम आणि पॉवर बटन लाइट साइडवर असून मागील मॉडेलप्रमाणे पंच होल डिस्प्ले डिझाइन मिळेल.

OnePlus 12 चा Display
कंपनीचा दावा आहे की फोनला A+ सर्टिफिकेट मिळाले आहे आणि डिस्प्लेला 2K रिझोल्यूशन सपोर्ट मिळेल. डिस्प्लेची साईज किती असेल याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. या फोनमध्ये आधीच्या आकाराइतकाच 6.7 इंचाचा डिस्प्ले असू शकतो असा अंदाज आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कचरा गाड्यांच्या माध्यमातून करदात्यांची लूट ; नगरसेवक योगीराज गाडे काय म्हणाले पहा

अहिल्यानगर । नगर सह्याद्री महापालिका व आयुक्त यशवंत डांगे जनतेची दिशाभूल करत असून नव्या कचरा...

आयुक्त डांगेंच्या नियुक्ती चौकशीचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, नेमकं प्रकरण काय पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांच्या नियुक्तीवर...

धक्कादायक ! डॉक्टर महिलेच्या मृत्यूचा PM रिपोर्ट आला पण…’या’ प्रश्नांचं गूढ अद्याप कायम

सातारा / नगर सह्याद्री - सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एका सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या युवा...

बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम; पारनेरचे भूमिपुत्र आंदोलनात दाखल

पारनेर / नगर सह्याद्री - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी...