अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
विधानभवन गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड जाहीर होताच अहिल्यानगर शहर भाजपाच्या वतीने ढोल ताशांच्या गजर करत या घोषणेचे स्वागत करत जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पक्षाच्या भाजपाचे झेंडे फडकावत पदाधिकाऱ्यांनी नाचून, नागरिकांना लाडू वाटून आनंद व्यक्त केला. यावेळी देवेंद्र फडणवीसांचे फोटो झळकावत जय श्रीराम…, भारतमाता की जय…, एकच भाऊ देवा भाऊ… अशा जोरदार यावेळी देण्यात आल्या. तसेच लक्ष्मिकारंजा येथील भाजप कार्यालय ते चौपाटी कारंजा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्या पर्यंत वाजत गाजत विजयी मिरवणूक काढण्यात आली.
भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आनंदोत्सवात मोठ्या संख्यने पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होत. ज्येष्ठ नेते सुनील रामदासी व प्रा.भानुदास बेरड यांच्या हस्ते भारतमाता व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी अॅड. अभय आगरकर म्हणाले, भारतीय जनता पार्टीने पूर्ण राज्यात सर्व विरोधकांना नेस्तनाबुत करत ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. आज देवेंद्र फडणवीस यांच्या सारख्या डायनामिक, सक्षम, प्रगतीशील नेतृत्वाचा आता मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात महायुती आहे तर गती आहे व प्रगती आहे. देवेंद्र फडणवीस हे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा अंत्योदयाचा विचार प्रत्यक्षात आणतील. त्यामुळे येणारा काळ हा राज्याच्या विकासाचा, सर्व स्तरातील प्रगतीचा, सर्व समाजाला बरोबर घेत संधी देणारा काळ ठरणार आहे. शहर भाजपच्या वतीने देवा भाऊचे अभिनंदन करताना खूप अभिमान वाटत आहे.
यावेळी सरचिटणीस सचिन पारखी, प्रशांत मुथा, महेश नामदे, बाबासाहेब सानप, सुरेंद्र गांधी, दत्ता गाडळकर, मयूर बोचूघोळ, नितीन शेलार, महिला शहराध्यक्ष प्रिया जानवे, रेणुका करंदीकर, ज्योती दांडगे, राखी आहेर, कालिंदी केसकर, सुनंदा गंजी, सविता कोटा, पल्लवी जाधव, राजू मंगलारप, बंटी डापसे, कैलास गर्जे, महावीर कांकरिया, गोपाल वर्मा, सुहास पाथरकर, बाळासाहेब खताडे, सुनील तावरे, राजेंद्र काळे, अमोल निस्ताने, ओंकार लेंडकर, आकाश सोनवणे, स्वप्निल बेंद्रे, बाळासाहेब गायकवाड, विजय गायकवाड, संपत नलावडे, सुजित खरमाळे, गोकुळ काळे, राहुल जामगावकर, रवींद्र बारस्कर, अनिल सबलोक, धिरडे, संतोष गांधी वैभव लांडगे, सचिन कुसळकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.