spot_img
ब्रेकिंग‘एकदा निघालो, तर थांबणार नाही’; सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम, मनोज जरांगेंनी पत्रकार...

‘एकदा निघालो, तर थांबणार नाही’; सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम, मनोज जरांगेंनी पत्रकार परिषदेत फोडली डरकाळी..

spot_img

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी आक्रमक झाले आहेत. आरक्षणासाठी चलो मुंबई या त्यांच्या मोर्चाला सुरुवात केली आहे. या मोर्चासाठीची, आंदोलनाची तयारी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने मोर्चा रवाना होणार आहे.

29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाड मैदानावर मनोज जरांगे पाटील हे मराठा आंदोलकांसह आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. आंदोलनाला सुरुवात होण्यापूव मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मोर्चाचा आराखडा सांगितला. तसेच फडणवीस सरकारला दोन दिवसांचा कालावधी दिला आहे. आरक्षणाची अंमलबजावणी झाल्याशिवाय मागे हटणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

जरांगे पाटील म्हणाले, ‌’आम्ही आमच्या मागण्यावर ठाम आहे. मराठा आणि कुणबी एक आहेत, हा जीआर आम्हाला मंजुरीसह हवाय. त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही. हैदराबादचे गॅझेट आम्हाला लागू केलेले हवं आहे. त्यावर अभ्यास सुरू आहे, खोटी माहिती आम्ही ऐकूण घेणार नाही. 13 महिन्यापासून गॅझेटिवर अभ्याससुरू आहे. आता आम्ही ऐकू शकत नाही. जर आमच्या नोंदी सापडल्या आहेत, तर ते आम्हाला हवंय.‌’

‌’तिन्ही गॅझेटियर लागू केले म्हणून कुणी आडवे येणार नाही. आम्ही त्याशिवाय हटणार नाही. ओबीसीचा विरोध करायचा कारण नाही. आमचा जमिनीचा सातबारा सापडला आहे, त्यामुळे आम्हाला देणं भाग आहे. फडणवीस यांनी मराठ्याचे विषय समजून घ्यावे. 10 टक्के आऱक्षण नकोय, आम्हाला हक्काचे घर हवे आहे. आम्हाला हक्काचे आरक्षण हवे आहे‌’, असे वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले आहे.

मोर्चाचा मार्ग
27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मुंबईसाठी निघणार. जुन्नरमध्ये मुक्काम असेल.28 ऑगस्ट रोजी शिवनेरी गडाचे दर्शन घेऊन, राजगुरू खेड मार्गे चाकणला. चाकणहून तळेगाव लोणावळा, पनवेल, वाशी. 28 ऑगस्ट रोजी संध्याकाळी आझाद मैदान.29 ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू.

मराठा आरक्षणाचा गुलाल उधळूनच परतणार
आम्हाला वाहतूक कोंडी करायला जायचे नाही. मुंबईमधील कोणताही एक रस्ता आम्हाला द्या. आम्हाला न्यायासाठी द्यायला जायचेय. कुणाला त्रास व्हायचा म्हणून आम्ही जात नाही. आम्ही चाकण मार्गे जात आहोत. कल्याण मार्गे जात नाही. आताच काही लोकं आझाद मैदानावर गेल्याचे समजलेय, असे मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषदेमध्ये म्हटले. मराठा आरक्षणाचा गुलाल उधळूनच आम्ही परतणार असल्याचे ते म्हणाले.

मनोज जरांगे पाटील अन् मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये नेमकं काय बोलणं झालं?
संपूर्ण राज्य गणेशोत्सवाच्या तयारीला लागलेली असताना, मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत धडक मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी मोर्चाच्या मार्गाबद्दल माहिती दिली. ‘फडणवीस साहेबांनी न बसणाऱ्या २९ जाती ओबीसी आरक्षणात घातल्या. ते खुन्नस दाखवत आहेत. आज मी प्रेमानं सांगतोय. आम्हाला आरक्षण दिल्यास आम्ही मुंबईला जाणार नाही. दोन दिवसांचा वेळ, आजपासून मी बोलणार नाही. फडणवीस यांना ही प्रेमाची विनंती आहे’, असं पाटील म्हणाले.’अंतरवाली सोडल्यानंतर मी कोणत्याच मंत्र्याचं ऐकणार नाही. २ महिन्यांपूर्वी मी फडणवीसांना फोन केला होता. मला गरीब मराठ्यांच्या वेदना तुमच्यासमोर मांडायच्या आहेत. तुम्ही अंतरवालीत या, असं मी फडणवीसांना म्हणालो होतो. देवेंद्र फडणवीस लक्ष घालत नसतील तर, आडमुठेपणा कुणी केला? हे मुंबईकरांनी सांगावे’, असं पाटील म्हणाले.

चित्रा वाघ यांच्या आरोपांना मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर सडकून टीका केली आहे. चित्रा वाघ यांनी जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना जरांगेंनी स्पष्ट केले की, मी फडणवीस यांच्या आईविषयी काहीही बोललो नाही. जर काही शब्द चुकून गेला असेल तर मी तो माघारी घेतो. ती जी बाई बोलली, कोण वाघीण… आमच्या तीन-चार वर्षांच्या पोरी रक्ताच्या थारोळ्यात होत्या, तेव्हा तू कुठे होतीस? आता जागी झाली? तू माझ्या नादी लागू नकोस, तुझं सगळं गबाळ उचकीन. संध्याकाळपर्यंत तुझी सगळी माहिती माझ्याकडे येईल, अशा शब्दांत त्यांनी प्रत्युत्तर दिले. २७ ऑगस्ट रोजी मराठा मोर्चा मुंबईकडे कूच करणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. अंतरवाली सराटी येथे आयोजित पत्रकार परिषदेत हे वक्तव्य करण्यात आले. दरम्यान, मनोज जरांगेंच्या विधानांनंतर चित्रा वाघ काय प्रत्युत्तर देतात, याकडे राज्याचे लक्ष लागून आहे.

…तर मी सरकारही पाडू शकतो, मनोज जरांगे
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दंड थोपटले आहेत.मराठा आंदोलकांसह जरांगे पाटील २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानामध्ये आमरण उपोषण करणार आहेत. मोर्चा सुरु होण्याआधी आज (२५ ऑगस्ट) जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी मी सरकारही पाडू शकतो, असे म्हटले आहे. आम्हाला आरक्षण दिल्यास आम्ही मुंबईला येणार नाही. दोन दिवसांचा वेळ आहे. आजपासून मी बोलणार नाही. फडणवीस यांना ही प्रेमाची विनंती आहे. आम्हाला संविधानात बसणारे आरक्षण हवे आहेत. फडणवीस साहेबांना ही संधी आहे. ओबीसी तुमचे आहेत, आरक्षण दिल्यास मराठेही तुमचे होतील, असे वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले आहे. मराठा आणि कुणबी एक असल्याचा जीआर काढा. त्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. मागण्यांव मी आणि मराठे ठाम आहेत. तुमच्या हातात दोन दिवस आहेत. राज्यातील सर्व मराठ्यांनी कामे बंद करा. नोकरदार, व्यावसायिक, शेतकरी, सर्वकाही बंद ठेवा. सर्वांनी मुंबईकडे जायची तयारी करा. असा एकतेचा उठाव जगाच्या पाठीवर पुन्हा होणे नाही. लढ्याच्या सोहळ्यात मराठ्याच्या घरातील प्रत्येकाने सहभागी व्हा, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.

फडणवीस साहेब तुम्हाला संधी आहे, सोनं करा
यापूर्वीच्या सरकारमध्ये गिरीश महाजन यांनी मराठा आणि कुणबी एकच असल्याचे म्हटले होते, पण आता त्यांच्याच सरकारच्या काळात मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, एक घर, एक गाडी २७ तारखेला निघालीच पाहिजे. मोठ्या संख्येने मराठा समाजाने मुंबईकडे निघायचं आहे. आझाद मैदानावर होणाऱ्या या आंदोलनात कीर्तनकार सुद्धा सहभागी होणार आहेत, त्यामुळे हा एक भव्य-दिव्य कार्यक्रम असेल. फडणवीस साहेब तुम्हाला संधी आहे, सोनं करा, असे मनोज जरांगेंनी म्हटले.

मुंबईमध्ये येणार म्हणजे येणार
मनोज जरांगे यांनी मराठा तरुणांना आवाहन केले की आंदोलनादरम्यान कोणत्याही पोलिसाशी वाद घालू नका. पोलीस म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे पोलीस. पण जर मुंबईत मराठ्यांच्या पोराला काठीने जरी डावचिले तर पानंद रस्ता सुद्धा मोकळा राहणार नाही. २६ ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास २९ ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये येणार म्हणजे येणार. मी थांबत नसतो, असंही मनोज जरांगे म्हणाले.
आंतरवाली सोडल्यानंतर सरकारसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही. समाजाचं ह्या वेळेस रक्षण करा. कोणत्याही नेत्याला घाबरून घरी न बसता मुंबईला या, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. त्यामुळे आता सरकार यावर काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नारा महायुतीचा, तयारी स्वबळाची!; विखे-जगताप एक्सप्रेस सुसाट, कोतकरांची महापालिकेला एण्ट्री

भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या स्वतंत्र बैठका,  महाविकास आघाडीत शांतताच शांतता सुनिल चोभे | नगर सह्याद्री:- आगामी होऊ...

माझ्या नादी लागलीस तर तुझं सगळं गबाळ उचकीन; चित्रा वाघ यांच्या आरोपांना मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे....

ग्रामदैवत विशाल गणेश मंदिरात सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते बुधवारी ‌‘श्रीं‌’ची प्राणप्रतिष्ठा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- शहराचे ग्रामदैवत असलेल्या माळीवाडा येथील श्री विशाल गणेश मंदिर येथे गणेशोत्सवानिमित्त...

बाप्पाच्या आगमनापूर्वी पावसाचा जोर वाढला; 12 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा अलर्ट

मुंबई | नगर सह्याद्री गेल्या चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि पश्चिम उपनगरात पुन्हा एकदा जोरदार...