spot_img
ब्रेकिंगनववर्षाच्या पहिल्याच दिवशी भाविकांवर काळाचा घाला, ४ जणांचा जागीच मृत्यू, ८ गंभीर...

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भाविकांवर काळाचा घाला, ४ जणांचा जागीच मृत्यू, ८ गंभीर जखमी

spot_img

सोलापूर / नगर सह्याद्री –
Nanded devotees killed in fatal Solapur road accident : नव्या वर्षाचं राज्यभर उत्साहात स्वागत करण्यात आले. सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेकजणांनी मंदिरात जाणं पसंत केले. नव्या वर्षात देवदर्शनाला जाताना काळाने घाला घातलाय. सोलापूरमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर सात ते आठ जण गंभीर जखमी झाल्याचे समजतेय. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.

नवीन वर्षी देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातलाय. स्कॉर्पिओ आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झालाय. त्यामध्ये दोन महिला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे. जखमींना सोलापूरमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आलेय. गणगापूरला जात असताना मैंदर्गीजवळ अपघात झाल्याचे समजतेय. मृत हे नांदेड जिल्ह्यातील असल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर आलेय.

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ दर्शन घेऊन गणगापूरला जातं असताना मैंदर्गी जवळ स्कॉर्पिओ आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. समोरासमोर झालेल्या अपघातात 2 महिला आणि 2 पुरुष यांचा जागीच मृत्यू झाला. तर 7 ते 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व भाविक नांदेड जिल्ह्यातील आहेत. अपघातस्थळी अक्कलकोट पोलीस दाखल झाले असून जखमींना तातडीने अक्कलकोट सार्वजनिक रुग्णालयात करण्यात दाखल आले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हिंदू संकृतीला डळमळीत करणार्‍या वोकिझम संकटाला समजून घ्या; शिवशंभू व्याख्याते नीलेश भिसे

उत्कृष्ट आरास स्पर्धेत सिद्धेश्वर तरुण मंडळ व समर्थ युवा प्रतिष्ठान प्रथम अहिल्यानगर | नगर सह्याद्री आता...

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पाणीपुरीवाल्याला मारहाण, नगरमध्ये ‘येथे’ घडला प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील दिल्लीगेट परिसरात पाणीपुरी विक्रेत्याने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग...

चास घाटात दरोडा!; ‘ती’ टोळी पकडली

चास घाटाजवळील घटना; सात लाख ९० हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे...

धक्कादायक! नाशिकमध्ये गावगुंडांकडून पत्रकारांना बेदम मारहाण

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये पत्रकारांना गावगुंडानी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर...