spot_img
अहमदनगरसोने घासुन देण्याच्या बहाणा, दिड लाखांला लावला चुना; सीसीटिव्ही कॅमेर्‍यात कैद

सोने घासुन देण्याच्या बहाणा, दिड लाखांला लावला चुना; सीसीटिव्ही कॅमेर्‍यात कैद

spot_img

सुपा शहरातील घटना । सीसीटिव्ही कॅमेर्‍यात कैद
पारनेर । नगर सहयाद्री
पारनेर तालुक्यातील सुपा येथे दोन अनोळखी इसमांनी सोन्याचे दागिने घासुन देण्याचा बहाना करत सुमारे दिड लाखाचे दागिने पळवल्याची घटना घडली आहे. सदरची घटना सीसीटिव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात संपत तागडे ( रा. सूपा, ता, पारनेर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवार दि. २१ रोजी दुपारी सुपा येथील निवासस्थानी दोन अज्ञात इसमांनी दरवाजाची बेल वाजवली, बाहेर दोन अनोळखी इसम उभे होते. त्यांच्या खांदयावर काळ्या व लाल रंगाची बॅग होती. त्यांनी आम्ही कंपनीचे माणसे असुन भांडी खासण्याची पावडर विकत असल्याचे सांगीतले. त्यांनी घरातील तांब्याचे भाडे घासुन दाखवले. तेवढ्यात पत्नी देखील आली.

तेव्हा त्यातील एकाने तुमच्या बायकोच्या गळ्यातील सोन्याचे दागीने हे काळे पडलेले आहेत ते घासुन देतो असे सांगीतले. त्यानंतर पत्नीने सोन्याचे डोरले, कानातील फुले व वेल, गळ्यातील सोन्याचे गंठण रूमालावर ठेवले. त्यानंतर त्यांनी रूमालावरील सोन्याचे दागिने घेत दोघांनी धूम ठोकली. दरम्यान दागिने चोरणारे इसम हे सुपा ग्रामपंचायतीच्या सीसीटिव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. पोलिस निरिक्षक अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलिस अधिक तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पक्षापेक्षा कोणीही मोठं नाही : आमदार दाते यांचे मोठे विधान

पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक; पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पारनेर / नगर सह्याद्री रविवार दिनांक ७...

कायनेटिक चौकातील परिसरातील नागरिकांना धोका?, माजी सभापती मनोज कोतकर मैदानात, नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री कायनेटिक चौक परिसरातील काही भागात गेल्या 1 महिन्यापासून दूषित पाणी...

सोशल मीडिया बंदीवरुन राडा, तरुणाई संसदेत घुसली, 5 आंदोलकांचा मृत्यू

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीवरून आक्रमक झालेल्या तरूणांनी सरकारविरोधात आंदोलन...

…अन्यथा दसरा मेळाव्यात पुढील भूमिका जाहीर करणार; जरांगे पाटलांचा सरकारला अल्टीमेटम, वाचा सविस्तर

जालना । नगर सहयाद्री:- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे...