spot_img
ब्रेकिंगAhmednagar Politics : निमित्त दिवाळी फराळाचं... पेरणी लोकसभेची! आ. नीलेश लंके यांच्या...

Ahmednagar Politics : निमित्त दिवाळी फराळाचं… पेरणी लोकसभेची! आ. नीलेश लंके यांच्या पडद्यामागील ‘मोठ्या’ हालचाली

spot_img

Ahmednagar Politics:

शरद झावरे | नगर सह्याद्री

आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस आमदार नीलेश लंके ( NILESH LANKE) यांना दिवाळी ही पर्वणी वाटत आहे. गुरुवार दि. १६ नोव्हेंबरला हंगा येथे दिवाळी फराळाचे आयोजन केले असून या निमित्ताने नगर शहरासह नगर लोकसभा मतदारसंघातील सर्वपक्षीय पदाधिकारी, सरपंच-उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व सेवा संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक व इतर प्रमुख कार्यकर्त्यांना भेटून निमंत्रण दिले आहे. फराळाचे निमित्त असले तरी ही संपूर्ण तयारी लोकसभा उमेदवारीचीच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांना टक्कर देण्यासाठी आमदार लंके शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. यानिमित्ताने आमदार लंके यांचे नवे नेटवर्क नगर लोकसभा मतदारसंघात निर्माण होणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनीही रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण व विविध कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आमदार लंके यांच्या मतदारसंघात दिला आहे. सार्वजनिक कार्यक्रमातही उपमुख्यमंत्री पवार आमदारांच्या कामाचे दाखले देत त्यांना एक प्रकारे लोकसभेसाठी लॉन्चिंग करण्याचा वेळोवेळी प्रयत्न करत असतात. त्यामुळे पवार कुटुंबियांची ताकद आमदार लंके यांच्या पाठीशी असून आगामी लोकसभा लढण्याचा निर्धार त्यांनी केला असून दिवाळी फराळाचे निमित्ताने शक्ती प्रदर्शन करत एक चर्चेचा विषय सुद्धा लोकसभा मतदारसंघात बनला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आगामी लोकसभेचे उमेदवार म्हणून पवार कुटुंबाकडून आमदार लंके व त्यांच्या सौभाग्यवती जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ राणीताई लंके यांच्या नावाची चर्चा आहे. त्या दृष्टीने या दिवाळी फराळाला वलय असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. दुसरीकडे आमदार लंके व महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील सध्या महायुतीच्या सरकारमध्ये असले तरी अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी एकमेकांवर टीका केली आहे.

त्यामुळे खा. विखे पाटील यांना आगामी लोकसभा निडणुकीत टक्कर देण्यासाठी पवार कुटुंबिय आमदार लंके किंवा त्यांच्या पत्नी सौ राणीताई लंके यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रही आहे. त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील मिळाल्याने जवळपास २०० कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नगर लोकसभा मतदारसंघ गेल्या तीन दिवसापासून पिंजून काढत दिवाळी फराळाचं स्नेह आमंत्रण गावागावात व वाड्या वस्त्यांवर देण्यात आले आहे. विधानसभेबरोबर लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आमदार लंके करत असून या साखरपेरणीचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होणार आहे.

राष्ट्रवादीकडून आमदार लंके किंवा राणीताई लंके

नगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे खा. सुजय विखे पाटील यांना सर्वसामान्य चेहरा म्हणून आमदार लंके टक्कर देऊ शकतात. या दृष्टीने पवार कुंटुंबियांकडून चाचपणी झाली आहे. त्यामुळे पवार कुटुंबातील सदस्य माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांच्यासह खा. सुप्रिया सुळे व त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार लंके यांच्या निवासस्थानी भेट देत कामाचे कौतुक केले आहे. आमदार लंके यांच्या माध्यमातून प्रती आर. आर.आबा पाटील आम्हाला मिळाल्याचे जाहीर कार्यक्रमात वक्तव्य केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी आमदार लंके अथवा राणीताई लंके यांची उमेदवारी अंतिम मानली जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महापालिका वॉर्ड रचनेची प्रतीक्षा संपली; तीन वॉर्डात काय आणि कसे झाले बदल पहा

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता एक हरकत अंशतः मान्य; महानगरपालिकेच्या...

भाजपाचे जेष्‍ठ नेते स्‍व.आ.शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यासाठी सर्वपक्षिय शोकसभेचे आयोजन

अहिल्‍यानगर / नगर सह्याद्री - भाजपाचे जेष्‍ठ नेते स्‍व.आ.शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यासाठी सर्वपक्षिय...

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...

स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार – इंजी. शामभाऊ जरे

श्रीगोंदा / नगर सह्याद्री दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड...