भाजप नेते विश्वनाथ कोरडे यांची माहिती
पारनेर । नगर सहयाद्री:-
भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेचे मा. सदस्य विश्वनाथ कोरडे यांच्या संकल्पनेतून तसेच अंजना सोशल फाउंडेशन व विश्वनाथ कोरडे मित्रपरिवाराच्या वतीने २६ रूपयांत विविध प्रकारचे शासकीय दाखले देण्यात येणार असल्याची माहिती भाजप नेते विश्वनाथ कोरडे यांनी दिली. विविध शासकीय दाखल मिळविताना नागरीकांची मोठी कुचंबना होते. वेळ आणि पैशांचाही मोठा अपव्यय होतो. हे लक्षात घेऊन ऑनलाईन सेतूवाला या संकल्पनेतून नागरीकांना अवघ्या २६ रूपयांत दाखला मिळणार आहे. विविध दाखले मिळविताना नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. दाखल्यांसाठी नागरीकांची आर्थिक लुटही होते.. या गोष्टींचा विचार करून नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नागरीक व शासकीय यंत्रणा यांच्यातील हितसंबंध वृध्दींगत करण्यासाठी ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्स साधून शासकीय फी पेक्षाही कमी खर्चात म्हणजे अवघ्या २६ रूपयात एक शासकीय दाखला देण्यात येणार आहे. सामाजिक भावनेतून उपक्रम समाजात काम करताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आपल्या कुवतीप्रमाणे सतत समाजाच्या हिताचे काम करत राहिले पाहिजे. म्हणून अंजना सोशल फाउंडेशन आणि विश्वनाथ दादा कोरडे मित्र परिवाराच्या वतीने २६ रूपयांत दाखल्याची संकल्पना राबविण्यात येत आहे.
उद्याच्या काळातही समाजासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न राहील असे कोरडे यांनी सांगितले. घरपोहोच दाखला मिळविण्यासाठी संबंधित व्यक्तिने आपल्या मोबाईल क्रमांकावरून ७७९६२२११७७ या क्रमांकावर हाय असा मेसेज पाठवायचा आहे. त्यानंतर आपणास ऑनलाईन पध्दतीने मिळणार असलेल्या दाखल्यांची माहीती येईल. आपणास हवा असलेला दाखला निवडल्यानंतर आवष्यक त्या कागदपत्रे त्या नंबरवर अपलोड केल्यानंतर फोन पे, गुगल पे, पेटीएम, भीम या अॅपवरून २६ रूपये आदा करायचे आहेत. त्यानंतर कीती दिवसांत हा दाखल भाजपाच्या कार्यालयात उपलब्ध होईल याची माहिती मिळेल.