निघोज | नगर सह्याद्री
जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरातील सहकारमहर्षी किसनराव वराळ पाटील कॉलेजतर्फे निघोज आणि परिसरात शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा उत्साहात साजरा झाला.
यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे सरदार, मावळे, मातोश्री जिजाबाई यांच्या वेशातील विद्यार्थी व विद्यार्थिनी लक्षवेधी ठरले. छत्रपतींचा जयजयकार करीत जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी परिसर निनादून गेला. बालराजे शिवाजी महाराज यांचा जन्म, त्यांचे बालपण, मातोश्री जिजाबाई यांनी त्यांना व त्यांच्या मावळ्यांना दिलेले प्रशिक्षण, रायरेश्वर येथील स्वराज्याची शपथ, छत्रपती शिवाजी महाराज व अफजलखान यांची भेट, ऐतिहासिक प्रसंग यावरील महानाटिका सादर केली.
त्यापूर्वी सकाळी नऊ वाजता संदीप पाटील उद्योग समूहाचे अध्यक्ष आप्पासाहेब वराळ पाटील यांच्या कार्यालयाजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन व संदीप पाटील उद्योग समूहातर्फे साजरी करण्यात आली.
यावेळी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आर के वराळ पाटील, फौंडेशनचे तालुअध्यक्ष सचिन वराळ पाटील, सरपंच चित्राताई वराळ पाटील, उपसरपंच माऊली वरखडे, शिक्षण संस्थेचे सचिव विराज वराळ पाटील, संदीप पाटील उद्योग समूहाचे अध्यक्ष आप्पासाहेब वराळ पाटील, भाजपचे तालुका सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष विलासराव हारदे, सोसायटीचे माजी चेअरमन भाऊसाहेब कोल्हे, विनायक वराळ, त्यांच्या पत्नी तसेच महिला भगीनी यांच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्याची पुजा करून महाआरती करण्यात आली.
ग्रामपंचायत चौक येथील महानाटिकानंतर छत्रपती शिवाजी महाराज तसेच इतर वेशातील विद्यार्थ्यांंचा उद्योग समूहाचे अध्यक्ष आप्पासाहेब वराळ पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संतोष सुपेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विलासराव हारदे यांनी आभार मानले.