Olympic schedule : बहुप्रतीक्षित ऑलिम्पिकचे वेळापत्रक जाहीर झाले असून ऑलिम्पिक 2028 स्पर्धेचा उद्घाटन समारंभ 15 जुलै 2028 रोजी होणार आहे. तसेच 30 जुलैला स्पर्धेचा समारोप समारंभ होईल. या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचाही समावेश झाला असल्याने क्रिकेट स्पर्धेच्याही तारखा समोर आल्या आहेत. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी ट्रायथलॉनचे पहिले मेडल स्पर्धा होईल.
दरम्यान, उद्घाटन जरी 15 जुलैला होणार असले तरी काही स्पर्धांना 12 जुलैपासून सुरुवात होणार आहे. पण 12 ते 14 जुलैपर्यंत कोणतेही मेडलचे सामने होणार नाहीत. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी यांसारख्या मोठ्या आणि सांघिक स्पर्धाही 12 जुलैपासूनच सुरू होतील. क्रिकेटला 12 जुलैपासून सुरुवात होणार असून 29 जुलैपर्यंत सामने होतील. हॉकी आणि फुटबॉल स्पर्धांचे देखील 12 जुलै ते 29 जुलै असे सामने होणार आहेत. ऍथलेटिक्स 15 जुलै ते 30 जुलै दरम्यान होईल.
लॉस अँजलिसमध्ये आयोजन
ऑलिम्पिक 2028 स्पर्धा 15 जुलै ते 30 जुलै 2028 दरम्यान लॉस अँजलिसमध्ये होणार आहे. या ऑलिम्पिकमध्ये प्रथमच क्रिकेटचा समावेश असून स्पर्धा 12 जुलैपासून सुरू होईल. या वेळापत्रकात 30 पेक्षा जास्त खेळांचा समावेश असून अनेक स्पर्धा उद्घाटनाआधीच सुरू होतील.