spot_img
अहमदनगरअय…पैसा तुमच्या बापाचा नाही; भरसभागृहात रोहित पवारांनी अधिकाऱ्याला झापलं कारण आले समोर…

अय…पैसा तुमच्या बापाचा नाही; भरसभागृहात रोहित पवारांनी अधिकाऱ्याला झापलं कारण आले समोर…

spot_img

जामखेड / नगर सह्याद्री
सोशल मीडियावर आमदार रोहित पवारांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील आहे. जामखेड तालुक्यात शुक्रवारी आमसेभेचे आयोजन करण्यात आलं होतं. प्रशासनातील कामचुकारपणावर बोट ठेवत रोहित पवारांनी एका अधिकाऱ्याला फैलावर घेत थेट आमसभेत झापलं.

गेल्या काही महिन्यांपासून जामखेड नगरपरिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या गटार योजनेत दर्जेदार काम होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात होत्या. मात्र, प्रशानाकडून याची गंभीर दखल घेतली जात नव्हती. अखेर आमदार रोहित पवारांनी सभागृहातच अधिकाऱ्याला खडेबोल सुनावले. या आमसभेत नागरिकांनी तक्रारींचा पाढाच रोहित पवारांनी समोर वाचला.

यानंतर एक व्यक्तीने संबंधित कामाबाबत अधिकाऱ्याला जाब विचारत असताना रोहित पवार नागरिकांच्या प्रश्नावर समाधानकारण उतर मिळत नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणी त्यांनी थेट अधिकाऱ्याला फैलावर घेत आतापर्यंत गोट्या खेळत होता का? तक्रार करणारे नागरिक बावळट आहेत का? तू मिजासखोर बनून अॅटीट्युड दाखवू नकोस. हा तुमच्या बापाचा पैसा नाही, हा लोकांचा पैसा आहे, अशा कठोर शब्दांत अधिकाऱ्याला खडसावलं. या निमित्ताने त्यांचा पुन्हा एकदा आक्रमकपणा पाहायला मिळाला.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
ये आतापर्यंत काय गोट्या खेळत होता का? हे फोटो दाखवत आहेत, हे खोटं आहे का? ही वेडी लोकं आहेत का? खिश्यातून हात काढ आधी, लय शहाणा काम करतोय तू. मिजासखोर तू बोलू नकोस, तुला सांगतोय. या लोकांनी दाखवलेले काम हे आमच्याकडं आलेले आहे. हे काम तपासले. ते खराब क्वालिटीचं झालंय. हा तुमच्या बापाचा पैसा नाही. हा लोकांचा पैसा आहे. तू कुठलाही अशील, इथं यांना राहायचंय. या लोकांनी दाखवलेलं काम हं खराब झालंय. उद्या बघतो, करतो असे काय सांगता. तुमचे आणि तुमच्या अधिकाऱ्यांचे पराक्रम आम्हाला माहिती आहेत, या तीव्र शब्दांत आमदार रोहित पवारां यांनी संताप व्यक्त केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हिंदू संकृतीला डळमळीत करणार्‍या वोकिझम संकटाला समजून घ्या; शिवशंभू व्याख्याते नीलेश भिसे

उत्कृष्ट आरास स्पर्धेत सिद्धेश्वर तरुण मंडळ व समर्थ युवा प्रतिष्ठान प्रथम अहिल्यानगर | नगर सह्याद्री आता...

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पाणीपुरीवाल्याला मारहाण, नगरमध्ये ‘येथे’ घडला प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील दिल्लीगेट परिसरात पाणीपुरी विक्रेत्याने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग...

चास घाटात दरोडा!; ‘ती’ टोळी पकडली

चास घाटाजवळील घटना; सात लाख ९० हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे...

धक्कादायक! नाशिकमध्ये गावगुंडांकडून पत्रकारांना बेदम मारहाण

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये पत्रकारांना गावगुंडानी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर...