spot_img
अहमदनगरबापरे! एक कोटींचे सोने लांबविले, सराफ बाजारात खळबळ; काय घडलं पहा

बापरे! एक कोटींचे सोने लांबविले, सराफ बाजारात खळबळ; काय घडलं पहा

spot_img

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
अहिल्यानगरच्या प्रसिद्ध सराफ बाजारात अनेक वर्षांपासून विश्वास संपादन करून काम करणाऱ्या सहा बंगाली कारागिरांनी तब्बल आठ सोनारांना १ कोटी १ लाख ५ हजार रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दागिने बनवण्यासाठी व दुरुस्तीसाठी दिलेले सुमारे २०११ ग्रॅम वजनाचे सोने घेऊन हे सर्व कारागीर कुटुंबासह पसार झाले आहेत.
​याप्रकरणी सोनार व्यावसायिक कृष्णा जगदीश देडगावकर (वय ३२, रा. गायकवाड कॉलनी, सावेडी) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा देडगावकर यांचे सराफ बाजारात ‘जगदीश लक्ष्मण देडगावकर’ व त्यांचे भाऊ प्रतीक यांचे ‘ए जे देडगावकर’ नावाने दुकान आहे. त्यांच्या दुकानाच्या तळमजल्यावर दिपनकर माजी, सोमीन बेरा (उर्फ कार्तिक), सत्तु बेरा, स्नेहा बेरा हे कारागीर काम करत होते. तसेच, त्यांच्या दुकानासमोर विजय जगदाळे यांच्याकडे सोमनाथ सामंता व अन्मेश दुलाई हे काम करत होते.

​रविवारी (दि. २६) सायंकाळी सव्वासात वाजता कृष्णा देडगावकर हे कारागीर दिपनकर माजी याच्याकडून तयार दागिने (४ गंठण, बांगड्या, राणी हार) घेण्यासाठी तळमजल्यावर गेले. मात्र, दिपनकर तेथे नव्हता. त्याला फोन केला असता, ‘दहा मिनिटांत येतो’ असे सांगून त्याने मोबाईल बंद केला. यानंतर देडगावकर यांनी सोमीन बेरा व इतरांना फोन केले, मात्र सर्वांचेच मोबाईल बंद लागले.

​बराच वेळ होऊनही कोणीच परत न आल्याने व इतर कारागिरांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने देडगावकर यांना शंका आली. त्यांनी सोमनाथ सामंता याच्या रामचंद्र खुंट येथील घरी जाऊन पाहिले असता, घराला कुलूप आढळले.

​या कारागिरांनी केवळ देडगावकर बंधूंचेच नव्हे, तर विजय राजाराम जगदाळे, सागर संजय गुरव, भरत दगडुशेठ शिराळकर, बरजहान सुलेमान शेख, प्रमोद आबासाहेब गाडगे, इम्रान आशरफ आली अशा एकूण आठ सोनारांचे सोने पळवले आहे. यात एकूण २०११ ग्रॅम सोन्याचे दागिने, चोख सोने व लगड यांचा समावेश आहे.
​घटनेनंतर हे सहा मुख्य कारागीर, त्यांच्या ठेकेदाराची पत्नी व तिचा भाऊ असे एकूण ११ ते १२ जण पळून गेल्याची माहिती समोर येत आहे. सर्वांनी संगनमत करून हा कट रचल्याचा संशय आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी दिपनकर माजी, सोमीन बेरा (कार्तिक), सोमनाथ सामंता, अन्मेश दुलोई, सत्तु बेरा व स्नेहा बेरा यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमीना शेख करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कचरा गाड्यांच्या माध्यमातून करदात्यांची लूट ; नगरसेवक योगीराज गाडे काय म्हणाले पहा

अहिल्यानगर । नगर सह्याद्री महापालिका व आयुक्त यशवंत डांगे जनतेची दिशाभूल करत असून नव्या कचरा...

आयुक्त डांगेंच्या नियुक्ती चौकशीचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, नेमकं प्रकरण काय पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांच्या नियुक्तीवर...

धक्कादायक ! डॉक्टर महिलेच्या मृत्यूचा PM रिपोर्ट आला पण…’या’ प्रश्नांचं गूढ अद्याप कायम

सातारा / नगर सह्याद्री - सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एका सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या युवा...

बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम; पारनेरचे भूमिपुत्र आंदोलनात दाखल

पारनेर / नगर सह्याद्री - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी...