spot_img
अहमदनगरबापरे! २१ गोण्या ड्रग्स पावडर पकडली; ' नोकरी सोडून तरुणाचा एमआयडीसी...'

बापरे! २१ गोण्या ड्रग्स पावडर पकडली; ‘ नोकरी सोडून तरुणाचा एमआयडीसी…’

spot_img

Ahilyanagar Crime: येथील एमआयडीसीमधील एका गोदामातून 21 गोण्या पांढर्‍या रंगाची पावडर व खडे घेवून निघालेला टेम्पो स्थानिक गुन्हे शाखा व श्रीरामपूर शहर पोलिसांनी दिघी शिवारात पकडला. ही ड्रग सदृश पावडर असून फॉरेन्सिक तपासणीसाठी या पावडरचे नमुने पोलिसांनी घेतले आहेत. काल बुधवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. श्रीरामपूर येथील एमआयडीमधून एक टेम्पो ड्रग सदृश पावडर घेवून जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना समजली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी श्रीरामपूर शहर पोलीस तसेच पोलीस उपाधिक्षक डॉ. बसवराज शिवपुजे यांना माहिती दिली.

दिघी शिवारात एक टेम्पो (क्र.एम एच-20 बी टी 0951) पोलिसांनी पकडला. त्यात 20 गोण्या पांढरा रंग असलेली पावडर व काही खडे आढळून आले. टेम्पो चालकास ही पावडर कोठून आणली याची माहिती विचारली असता त्याने श्रीरामपूर एमआयडीसी मधील गोदामातून हा माल उचलल्याची माहिती दिली. दौंड (जि.पुणे) येथील एका कंपनीमध्ये काही महिन्यांपूर्वी नोकरीस असलेल्या दौंड येथील तरुणाने नोकरी सोडून चार महिन्यापूर्वी श्रीरामपूर एमआयडीसी मध्ये भाड्याने घेतलेल्या गोदामातून ही पावडर उचलण्यात आली आहे. या कारवाईत पकडलेला टेम्पो या तरुणाच्या . धनगरवाडी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर येथील मामाच्या मुलाच्या मालकीचा आहे.

दरम्यान घटनास्थळी अपर पोलिस अधिक्षक वैभव कलुबर्मे व पोलिस उपाधिक्षक डॉ. शिवपुजे यांनी भेट दिली. त्यांच्या उपस्थितीत या गोडावूनचे कुलूप तोडून गोडावूनची तपासणी करण्यात आली. मात्र तेथे काय सापडले याची माहिती उपलब्ध होवू शकली नाही. या कारवाईत पकडलेली ही ड्रग सदृस्य पावडर फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून त्यासाठी या पावडरचे नमुने पोलिसांनी घेतले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच ही पावडर नेमकी कशाची याचा उलगडा होणार आहे. ही ड्रग असेल तर त्याचे तेलंगणाशी काही कनेक्शन आहे का? याचाही शोध पोलिस घेत आहेत.

दोघांवर गुन्हा दाखल
रात्रीच्या वेळी करण्यात आलेल्या कारवाईत ७० किलो वजनाचा तब्बल १३ कोटी ७५ लाख रुपये किमतीचा ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला आहे. तर श्रीरामपूर पोलिस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आले. श्रीरामपूर तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात मोठे ड्रग्स रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता असून पोलिस त्या दृष्टीने अधिक तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...