अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
भातोडी (ता. नगर) शिवारातील शेतकर्याचे घर चोरट्यांनी दिवसा फोडले. सुमारे सव्वा दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने व तीन तोळ्याचे चांदीचे दागिने असा 68 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. सदरची घटनाा 10 डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीनच्या दरम्यान घडली असून या प्रकरणी रविवारी (15 डिसेंबर) सायंकाळी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बबन किसन खिळदकर (वय 52) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे भातोडी शिवारात राहते घर आहे. 10 डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी साडेतीनच्या दरम्यान चोरट्याने फिर्यादीच्या घराचे सेफ्टी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील सामानाची उचकापाचक केली.
बेडरूम मधील लाकडी कपाटाचे लॉक तोडून त्यातील 8 ग्रॅमचे सोन्याचे नेकलेस, 10 ग्रॅमचे सोन्याचे मनीमंगळसूत्र, चार ग्रॅमचे सोन्याचे कर्णफुले व 30 ग्रॅमचे पायातील चांदीच्या पट्ट्या असा सुमारे 68 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. सदरचा प्रकार दुपारी साडेतीनच्या सुमारास लक्ष्यात आला.
दरम्यान, फिर्यादी यांनी रविवारी नगर तालुका पोलिसांना घरफोडीची माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस अंमलदार एम. व्ही. कर्डक करत आहेत.