spot_img
अहमदनगरराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी, कर्मचारी बेमुदत संपावर; कारण काय?

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी, कर्मचारी बेमुदत संपावर; कारण काय?

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालयात सन 2005 पासून कंत्राटी पद्धतीने काम करत असलेल्या अधिकारी तसेच कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद अहिल्यानगर समोर बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित शासन सेवेत समायोजनाबाबत होत असलेल्या विलंबासाठी शासन निर्णय नुसार दहा वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना 14 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार शासन सेवेत समायोजन करणे बाबत निर्णय झालेला आहे.

परंतु सव्वा वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला आहे. तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर काम करत आहे. अधिवेशरात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आरोग्य सेवेतील मान्यता व प्राप्त सर्व कक्ष पदावर सामावून घेण्यात येईल असे सांगण्यात आले होते.

परंतु निर्णयाच्या अंमलबजावणी पूर्ण झालेली नाही. राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी यांना दहा टक्के मानधनवाढ व रॉयल्टी बोनस लागू करावा, कर्मचाऱ्यांना ईपीएफ ची योजना लागू करण्यात यावी, कर्तव्य बजावत असताना अपघात मृत्यू झाल्यास 50 लाअख सानुग्रह अनुदान लागु करावे तसेच कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पंचवीस लाख सानुग्रह अनुदान मिळावे, अपघात झाल्यास पाच लाख औषध उपचारासाठी सानु ग्रह अनुदान मिळावे.

अंगणवाडीप्रमाणेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी कर्मचारी व कर्मचारी यांनाही गट विमा लागू करण्यात यावा, अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनात 25 टक्के वाढ करण्यात यावी, विभागनिहाय रिक्त जागा अधिकृतपणे जाहीर कराव्यात, आरोग्य विभाग पदभरती जाहिरात प्रसिद्ध करणे पूव 14 मार्च 2024 शासन निर्णय प्रमाणे कर्मचारी व अधिकारी यांचे समायोजन करण्यात यावे अशा विविध स्वरूपाच्या मागण्यांसाठी 10 व 11 जुलै रोजी आझाद मैदानावर आंदोलन करून आरोग्य मंत्री यांची भेट घेतली.

तरीही मागण्या मान्य होत नसल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांनी पुकारलेल्या आंदोलनात महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी, बेमुदत काम बंद आंदोलनात तसेच जिल्ह्यातील सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचारी सहभागी आहेत. मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वाळू तस्करीतून पारनेरमध्ये गुन्हेगारीचा कहर; पोलिसांची गुन्हेगारांसोबत पार्टनरशिप?

भ्रष्ट पोलिसांच्या आश्रयाने गुन्हेगार बिनधास्त! वाळू तस्करीच्या वादात युवकाला मारहाण, फक्त एकाला अटक; पोलिसांची...

हार्दिकला मोठा झटका, शुभमन गिलकडे मोठी जबाबदारी

आशिया कपसाठी सूर्याच्या शिलेदारांची निवड नगर सह्याद्री वेब टीम - आशिया चषकासाठी भारतीय संघाची आज घोषणा...

बंदुकीच्या धाकाने पत्नीला मारहाण

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड येथील सागर हॉटेलजवळ राहणाऱ्या स्नेहल निखिल शेकडे...

केडगावात फुटली विकास कामांची हंडी

संदीप कोतकर युवा मंचच्या दहीहंडीला सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची हजेरी; दहीहंडी महोत्सवाला हजारो...