spot_img
अहमदनगरअक्षय तृतीयानिमित्त श्री विशाल गणेशाला ५५५1 आंब्यांचा नैवेद्य

अक्षय तृतीयानिमित्त श्री विशाल गणेशाला ५५५1 आंब्यांचा नैवेद्य

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात अक्षय तृतीयानिमित्त श्री विशाल गणेशाला ५५५१ आंब्यांचा नैवेद्य दाखवून आंब्यांची सजावट करण्यात आली होती. सकाळी अभिषेक करण्यात आला. दुपारी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, सौ.राखी फिरोदिया यांच्या हस्ते महापुजा करुन आरती करण्यात आली.यावेळी केलास आहुजा आदी उपस्थित होते.

याप्रसंगी पुजारी संगमनाथ महाराज, याप्रसंगी देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त प्रा माणिकराव विधाते, प्रा.नितीन पुंड, गौरव भंडारी, सोहम फिरोदिया, रेखा सारडा , गणेश राऊत,आकाश पटवेकर , आदि उपस्थित होते.

यावेळी आशाताई शांतीकुमार फिरोदिया ट्रस्ट व उदयोजक नरेंद्र फिरोदिया यांच्यावतीने हा आंब्याचा प्रसाद देण्यात आला होता. याप्रसंगी अशोकराव कानडे म्हणाले, ‘अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला. या दिवशी सत्ययुगाचा प्रारंभ झाली. अशी संधी साधलेली असल्यामुळे अक्षय तृतीया या संपूर्ण दिवसाला ‘मुहूर्त’ म्हणतात. या दिवसाला साडेतीन मुहूर्तांतील एक मुहूर्त मानले जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सातत्याने सुख-समृद्धी प्राप्त करून देणार्‍या देवतेची कृतज्ञतेचा भाव ठेवून उपासना केल्यास देवतेच्या कृपादृष्टी कायम आपल्यावर राहते. या काळात केलेले दानही सर्वात पवित्र मानले जाते. असेच अक्षयतृतीयानिमित्त आंबा स्वरुपात भाविकांनी दान दिले असल्याचे सांगून भाविकांना दर्शन सुलभ व्हावे, यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या असल्याचे सांगितले.

यावेळी पंडितराव खरपुडे यांनी देवस्थानच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. दानशूर भाविकांचे आभार मानले. सूत्रसंचालन प्रा माणिकराव विधाते यांनी केले तर प्रा नितीन पुंड यांनी आभार मानले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भारत-पाक तणाव वाढला, मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय; RAWच्या माजी प्रमुखांवर मोठी जबाबदारी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचे संबंध ताणलेले असताना मोदी सरकारनं राष्ट्रीय सुरक्षा...

नगरमध्ये बसस्थानकावर दोघा भावांवर जीवघेणा हल्ला; नेमकं काय घडल पहा

  अहिल्यानगर / नगर सह्याद्री - वाटेफळ (ता. अहिल्यानगर) येथील सर्विस रस्त्यावरील बस स्थानकावर रविवारी (27...

शेतकऱ्यांनो कामं उरकून घ्या, मुंबईला जायचं, मनोज जरांगेंची मोठी घोषणा

बीड / नगर सह्याद्री : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसलं...

भयंकर…! चौथी मुलगी झाल्याने आई बनली हैवान; बाळा सोबत केले नको ते…

नगर सह्याद्री वेब टीम : डहाणू शहरातील लोणीपाडा येथून हृदयद्रावक घटना समोर आली आहे....