spot_img
ब्रेकिंगवाल्मीक कराडच्या एन्काऊंटरसाठी ५० कोटींची ऑफर, दाव्याने खळबळ...

वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरसाठी ५० कोटींची ऑफर, दाव्याने खळबळ…

spot_img

बीड / नगर सह्याद्री –
बीडमधील निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. आरोपी वाल्मीक कराड याच्या एन्काऊंटरची ऑफर असल्याचा दावा रणजीत कासले यांनी केला आहे. कासले यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट करत हा दावा केला आहे. ५० कोटींची ऑफर दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे. कासले यांच्या या दाव्यानंतर बीडमधील प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची मला ऑफर होती, असा दावा केलाय. बनावट एन्काऊंटरसाठी ५ कोटी, १० कोटी आणि ५० कोटी रूपयांची ऑफर दिली जाते असं देखील रणजीत कासले यांनी म्हटलेय. कासले यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट करत खळबळजनक दावा केला आहे. रणजीत कासले यांचा हा व्हिडिओ बीड मधील सोशल माध्यमांवर चांगलाच वायरल होतोय.

रणजीत कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते. मागील काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी अनेक दावे त्यांच्या सोशल माध्यमातून केले आहेत. आता वाल्मीक कराड याच्या एन्काऊंटर बद्दल केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडालीय. गेल्या काही दिवसांपासून बीडमधील घडामोडीने राज्याचे लक्ष वेधलेय. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकणानंतर बीडची कायदा सुव्यवस्थेकडे राज्याचे लक्ष लागले होते. आता त्याच कासलेने केलेल्या नव्या दाव्याने खळबळ उडाली.

रणजीत कासले चर्चेत येणाची ही काही पहिली वेळ नाही. कासले यांनी गुजरातमध्ये जाऊन एक कोटी रुपयाची खंडणी मागितल्याचे समोर आले होते. खंडणीचे पैसे घेतानाचा कासले यांचा व्हिडिओ समोर आला होता. तसेच काही फोटोग्राफही समोर आले आहेत ज्यात बंदूक ठेवून दहशत निर्माण करत असल्याचे दिसते. याप्रकारानंतर कासले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. आता सोशल मीडियाच्या माध्यामातून खळबळजनीक दावा केला जातोय.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...