spot_img
ब्रेकिंगजरांगेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट; तरुणाला बेदम मारहाण

जरांगेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट; तरुणाला बेदम मारहाण

spot_img

छत्रपती संभाजीनगर | नगर सह्याद्री
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट करणार्‍या एका तरुणाला जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर मधील मुकुंदवाडी येथे घडली आहे.

मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याने दीपक बद्री नागरे (वय ३५, रा. मुकुंदवाडी) याला दोनशे ते अडीचशे जणांच्या जमावाने घरातून बाहेर काढत बेदम मारहाण केली. मारहाण करतच त्याला मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. ही घटना मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.

नागरेच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे मुकुंदवाडीत काही काळ तणाव निर्माण झाला होता. मारहाण करण्यात आलेला तरुण दीपक हा दुपारी मनोज जरांगे यांची भेट घेऊन परत आला होता. त्यानंतर त्याने जरांगे यांच्यासोबचा सेल्फी स्टेटसला ठेवताना एका ओळीचा आक्षेपार्ह मजकूर लिहल्याचा आरोप होत आहे.

तर त्याच्या स्टेटसचा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर जमावाने मुकुंदवाडी भागात राहत असलेल्या दीपक नागरेचे घर गाठत त्याला मारहाण केली आहे. त्यानंतर जरांगे पाटलांच्या समर्थकांनी संबंधित तरुणाला माफी मागायला लावली. ‘माझ्या कडून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली होती. ती नजरचुकीने झाली होती. या बद्दल मी मराठा समाजाची माफी मागतो,अशा शब्दांत तरुणाने माफी मागितली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भाजप-राष्ट्रवादीचं ठरलं!, महापालिका निवडणुकीत युती; एमआयएमही उतरणार मैदानात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना आता...

नेपाळमध्ये राडा! आंदोलकांनी संसद पेटवली, पंतप्रधानांचा राजीनामा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमधील परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. निदर्शनांनी हिंसक...

चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे शुक्रवारी भूमिपूजन; आमदार कर्डिले यांची माहिती, कोण कोण राहणार उपस्थिती?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे भूमिपूजन येत्या शुक्रवार दिनांक 12...

विसर्जन मिरवणुकीत युवकाचा खून; कुठे घडली घटना?

सांगली । नगर सहयाद्री:- मिरज तालुक्यातील अंकली गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांमध्ये सुरू...