spot_img
अहमदनगरनगरसेवकाच्या कार्यालयाचा 'या' कामाला अडथळा! अतिक्रमित बांधकामावर हातोडा पडणार का?

नगरसेवकाच्या कार्यालयाचा ‘या’ कामाला अडथळा! अतिक्रमित बांधकामावर हातोडा पडणार का?

spot_img

अतिक्रमित बांधकामावर हातोडा पडणार का? केडगावकरांचा सवाल

अहमदनगर | नगर सह्याद्री

सर्वसामान्यांच्या अतिक्रमणातील बांधकामांवर महापालिका प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग हातोडा टाकते परंतु धनदांडग्यांच्या अतिक्रमणांवर प्रशासन कारवाई करण्यास धजावत नाही. असाच काहीसा प्रकार केडगाव लिंक रोडवरील अतिक्रमणाबाबत उघडकीस आला आहे. माजी नगरसेवक, डेव्हलपर्स असलेल्या एकाचे लिंक रोडच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. त्या अतिक्रमणावर प्रशासन हातोडा टाकणार का असा सवाल केडगावकर उपस्थित करत आहेत.

पुणे महामार्गापासून कल्याण महामार्गाकडे जाण्यासाठी केडगावमधून लिंक रोड तयार करण्यात आला आहे. या रस्त्याची दुरावस्था झाली होती. परंतु, सध्या या संपूर्ण लिंक रोडचे काँक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. तसेच डे्रेनेज लाईनचेही काम सुरु आहे. रस्त्यालगत असलेली अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. परंतु, याच रस्त्याच्या कामात एका माजी नगरसेवकाचे कार्यालय असलेले बांधकाम अडथळा ठरत आहे.

बांधकामामुळे ड्रेनेज लाईनचे काम रखडले आहे. महापालिका व सार्वजनिकबांधकाम विभाग सर्वसामान्यांच्या अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करते. परंतु, धनदांडग्यांच्या अतिक्रमीत बांधकामांवर कारवाई करण्यास धजावत नाही. सर्वसामान्यांच्या अतिक्रमणांवरच कारवाई का असा सवाल केडगावकरांकडून उपस्थित केला जात आहे. त्या नगरसेवकाच्या बांधकामाला कोणाचे अभय आहे. रस्त्याच्या कामासाठी बांधकाम पाडले जाणार का असा सवाल केडगावकरांमधून उपस्थित केला जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हिंदू संकृतीला डळमळीत करणार्‍या वोकिझम संकटाला समजून घ्या; शिवशंभू व्याख्याते नीलेश भिसे

उत्कृष्ट आरास स्पर्धेत सिद्धेश्वर तरुण मंडळ व समर्थ युवा प्रतिष्ठान प्रथम अहिल्यानगर | नगर सह्याद्री आता...

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पाणीपुरीवाल्याला मारहाण, नगरमध्ये ‘येथे’ घडला प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील दिल्लीगेट परिसरात पाणीपुरी विक्रेत्याने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग...

चास घाटात दरोडा!; ‘ती’ टोळी पकडली

चास घाटाजवळील घटना; सात लाख ९० हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे...

धक्कादायक! नाशिकमध्ये गावगुंडांकडून पत्रकारांना बेदम मारहाण

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये पत्रकारांना गावगुंडानी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर...