spot_img
ब्रेकिंगबहिणीसोबत अश्लील चॅटिंग; मित्राने केला मित्राचा दगडाने ठेचून खून

बहिणीसोबत अश्लील चॅटिंग; मित्राने केला मित्राचा दगडाने ठेचून खून

spot_img

पुणे / नगर सह्याद्री :
मित्राच्या बहिणीसोबत इंस्टाग्राम अकाउंटवर अश्लील चॅटिंग करणाऱ्या तरूणाचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक पुण्यातील आंबेगाव बुद्रुकमध्ये घडली. रोहित धुमाळ असे मृत तरुणाचे नाव आहे, तर सूरज गणेश सूर्यवंशी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी सूरज गणेश सूर्यवंशी याला मध्य प्रदेशातून आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे.

मित्राच्या बहिणीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम खाते तयार करून तिच्यासोबतच अश्लील चॅटिंग करणाऱ्या रोहित धुमाळ याचा खून करण्यात आला. पुण्यातील आंबेगाव बुद्रुक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जांभूळवाडी तलाव परिसरात ही घटना घडली. खून करून पळून गेलेल्या आरोपीला आंबेगाव पोलिसांनी मध्य प्रदेशात जाऊन मुसक्या आवळल्या. याबाबत दीपक यानं पोलिसात फिर्याद दिली होती. प्राथमिक माहितीनुसार, दीपक, सूरज आणि रोहित हे तिघेही मित्र होते. रोहित याने मित्राच्या बहिणीच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट खातं तयार केले होते अन् तिच्यासोबतच अश्लील चॅटिंग करत होता. त्यामुळे संतापून त्याचा खून करण्यात आला.

आंबेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित आणि सुरज मित्र होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्याने सूरज याच्या मित्राच्या बहिणीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार केले होते. आणि या अकाउंट वरून तो तिच्याशी अश्लील भाषेत चॅटिंग करत होता. मित्राच्या बहिणीने हा संपूर्ण प्रकार सुरज याला सांगितला. त्यानंतर सुरजने अकाउंटवर इंस्टाग्राम कॉल केला असता तो रोहितने उचलला. १५ जून रोजी मयत रोहित, आरोपी सुरज आणि फिर्यादी दीपक तिघे कात्रज परिसरातील जांभुळवाडी तलावावर एकत्र जमले होते. यावेळी रोहित आणि दीपक यांच्या मित्राच्या बहिणी वरून भांडण झाले. रागाच्या भरात सूरजने दगडाने वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रोहितचा मृत्यू झाला. या प्रकरणी सूरजला अटक करण्यात आली. आंबेगाव पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खासदार लंके गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

  पारनेर / नगर सह्याद्री- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस...

‘साकळाई’ची प्रशासकीय मान्यता घेऊन तात्काळ भूमिपूजन, प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी

साकळाई योजना कृती समितीची बैठक हिवरे झरे येथे संपन्न सुनील चोभे / नगर सह्याद्री- नगर तालुक्यातील...

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ शेतकऱ्याची शेळी खाल्ल्यानंतर वन विभागाची मोहीम यशस्वी सुपा / नगर...

वनविभागाच्या निष्क्रियता: पारनेर तालुक्यात बिबट्यांचा वाढता उपद्रव; कळस येथील घटनेने खडकवाडी येथील घटनेची आठवण!

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात मुळा नदीचा पट्टा व मुळा धरण...