spot_img
अहमदनगरAhmednagar: ओबीसी समाजाचा नगरमध्ये 'या' तारखेला ’एल्गार’ मेळावा

Ahmednagar: ओबीसी समाजाचा नगरमध्ये ‘या’ तारखेला ’एल्गार’ मेळावा

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
ओबीसी समाजाचा ३ फेब्रुवारीला नगरमध्ये ’एल्गार’ मेळावा होत आहे. नगरमधील क्लेरा ब्रुस हायस्कुलच्या ३५ एकर मैदानावर एल्गार मेळावा होणार असून नगर जिल्ह्यासह मराठवाड्यातून तब्बल दोन ते अडीच लाख ओबीसी बांधव येतील अशी माहिती समता परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी दिली.

मराठा कुणबी नोंदी असलेल्यांच्या सग्यासोयर्‍यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबतच्या अधिसूचनेनंतर मंत्री छगन भुजबळ हे सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. मुंबई येथे ओबीसी समाजाच्या नेत्यांची बैठक त्यांनी घेतली. तसेच नगरमध्ये ३ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता होत असलेल्या एल्गार मेळावाच्या नियोजनात भुजबळ यांनी त्यांची नाशिक टीमही उतरवली आहे.

समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी या मैदानाची पाहणी केली. यावेळी त्यांच्याबरोबर नाशिकमधील समता परिषदेच्या पदाधिकार्‍यांबरोबर नगरमधील स्थानिक पदाधिकारी देखील उपस्थित होते. काही लोक एल्गार मेळावाच्या एकदिवस अगोदर मुक्कामी असणार आहेत. त्यांच्या जेवणापासून ते मुलभूत सोयीपर्यंत सर्व नियोजन नगरमधील ओबीसी नेते आणि पदाधिकार्‍यांनी केली आहे.

 

 

 

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सनम बेवफा! पती गेल्यानंतर बायकोचं बॉयफ्रेंडसोबत गुलुगुलु; पतीनं गळा दाबून संपवलं

Crime News : छत्तीसगढच्या बिलासपूरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. पती बाथरूममध्ये गेल्यानंतर...

शासकीय कामात अडथळा; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल, वाचा नगर क्राइम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भिंगार परिसरात घरगुती वादाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपींनी धक्काबुक्की...

शरद पवार यांचा गंभीर आरोप; महायुतीच्या नेत्यांवर केली टीका., वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री निवडणुकीत कामावर नाही तर पैसे-निधीवर मतं मागितली जात आहेत. पैसे किती...

नो-पार्किंग कारवाईतील दंड कमी करा; अन्यथा मनपावर मोर्चा, कोणी दिला इशारा…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री शहरातील वाहतूक नियोजनाच्या नावाखाली नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर करण्यात येणारी...