spot_img
ब्रेकिंगओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर नगरमध्ये हल्ला

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर नगरमध्ये हल्ला

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री
ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे. अहिल्यानगर जवळ असलेल्या अरणगाव बाह्यवळण रस्त्यावर लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अज्ञात तरुणांनी हल्ला केला.

नाश्ता करून पुढे जात असताना अज्ञात तरुणांनी काठ्यांनी गाडीवर हल्ला केला. आज पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर येथे ओबीसी एल्गार सभेसाठी लक्ष्मण हाके जात होते. दुपारी दोन वाजता त्यांची ही सभा होणार आहे. हल्ला झाला त्यावेळी लक्ष्मण हाके यांच्यासोबत पोलीस बंदोबस्त होता. अहिल्यानगर येथे वाहनावर झालेल्या हल्ल्यात लक्ष्मण हाके यांना काही झालेलं नाही. पण मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

आज लक्ष्मण हाकेंची पाथर्डी येथे सभा आहे. पुण्याहून लक्ष्मण हाके सभेसाठी पाथर्डी येथे चालले होते. तेव्हाच मध्येच रस्त्यावर हल्ला झाल्याची माहिती आहे. हे हल्ला करणारे कोण होते? त्यांची माहिती मिळू शकलेली नाही. हल्लेखोरांना लवकरच ताब्यात घेण्यात येईल असं पोलिसांकडून सांगण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये चाललंय काय? डिलिव्हरी बॉयवर सपासप वार, वडारवाडीत राडा, मुकुंदनगरमध्ये प्राणघातक हल्ला, वाचा क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील केडगाव परिसरात घरासमोर पार्क केलेली टाटा हॅरियर गाडी रात्रीच्या...

शनि शिंगणापूर मंदिर कार्यालयास ठोकले सील; कलेक्टरांकडून ‘देऊळ कार्यालय बंद’

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - शनी शिंगणापूर देवस्थानचे कार्यालय जिल्हा प्रशासनाकडून सील करण्यात आले...

नगरकरांनो सतर्क राहा! जिल्ह्यासाठी यलो अलर्ट, हवामान खात्याची महत्वाची अपडेट..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक 27 ते 29 सप्टेंबर 2025...

मर्चंट्‌‍स बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीत; सभासदांनासाठी खुशखबर, बँक काय देणार भेट?, वाचा सविस्तर

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सुवर्णमहोत्सवी वर्ष पूर्ण करणाऱ्या अहमदनगर मर्चंट्‌‍स बँकेला रिझर्व्ह बँकेने शेड्युल्ड बँकेचा...