spot_img
अहमदनगरआता शिवशक्ती बरोबर भीमशक्ती; 'महापालिका निवडणुकीसाठी आघाडी'; किरण काळे यांनी दिली मोठी...

आता शिवशक्ती बरोबर भीमशक्ती; ‘महापालिका निवडणुकीसाठी आघाडी’; किरण काळे यांनी दिली मोठी माहिती..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नगरकरांनी मनपा कारभारासाठी कायम शिवसेनेवर विश्वास दाखवला आहे. आता शिवशक्ती बरोबर भीमशक्ती देखील आल्यामुळे ताकद वाढली आहे. या माध्यमातून मनपा निवडणूक शतप्रतिशत जिंकू, असा ठाम विश्वास ठाकरे शिवसेनेचे महानगरप्रमुख किरण काळे यांनी व्यक्त केला आहे. आंबेडकरी समाज, भीमसैनिक हा शिवसेने सोबत खंबीरपणे उभा राहणार आहे.

शिवसैनिक, भीमसैनिकांनी कंबर कसून कामाला लागा. शिव – शाहू – फुले आंबेडकरांचा विचार आणि आपले शहर विकासाचे व्हिजन लोकांपर्यंत पोहोचवा. प्रत्येक भाग पिंजून काढा. घराघरात जा, असे आवाहन यावेळी काळे यांनी केले. जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी म्हणाले, हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात सगळ्यात आधी शिवशक्ती, भीमशक्तीचा प्रयोग केला होता. आता तो नगर शहरात पण झाला आहे. आगामी काळात आम्ही ग्रामीण जिल्ह्यात देखील हा प्रयोग यशस्वीरित्या करणार आहोत.

यावेळी उपजिल्हाप्रमुख रावजी नांगरे, कामगार सेनेचे विलास उबाळे, अनिस चुडीवाला, उपशहर प्रमुख सुनील भोसले, केडगाव शिवसेनेचे प्रतीक बारसे, उषा भगत, शैला लांडे, गणेश आपरे, शंकर आव्हाड, रिपाई अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष गुलामअली शेख, ओबीसी आघाडी शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ, अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष नईम शेख, वाहतूक आघाडी शहराध्यक्ष विल्सन रूकडीकर, अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अजीम खान, भिंगार शहराध्यक्ष स्वप्नील साठे, अल्पसंख्याक शहर उपाध्यक्ष निजाम शेख, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष जमीर सय्यद, शहर उपाध्यक्ष अरबाज शेख, शहर सचिव आफताब बागवान, युवक शहर उपाध्यक्ष योहान चाबुकस्वार, युवक शहर सचिव हुसेन चौधरी, शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, जिल्हा उपाध्यक्ष जमीर सय्यद, झाहिद अली सय्यद, मुस्तफा शेख, हुसेन चौधरी, राजेश बनसोडे, जय गजरमल, मंगेश तिजोरे, आकाश काळे, अभिजीत पंडित, स्वप्निल साठे, लकी वाघमारे, योहान चाबुकस्वार, सोहेल शेख आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका शिवसेना ताकतीने लढणार आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील नगर शहरासह सर्व तालुक्यातील इच्छुकांची चाचपणी करण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन केले जाणार असल्याचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, महानगर प्रमुख किरण काळे यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्याला गोळ्या घाला…; निंबळक बायपास चौकात रास्तारोको

हिंगणगाव, हमीदपूर, निंबळक, इसळक, खारेकर्जुने ग्रामस्थांचा निंबळक बायपास चौकात रास्तारोको अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गेल्या...

चुलत्याला वाचवण्यासाठी गेलेल्या पुतण्यावर धारदार शस्त्राने सपासप हल्ला, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्रील:- माझ्या शेतातील लाकडे का आणली? असा जाब विचारत एका तरुणाला...

ठाकरे शिवसेनेला भाजपचा झटका; ‘बड्या’ नेत्याचा भाजपत प्रवेश!

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी अहिल्यानगर शहरातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली...

इंदुरीकर महाराजांचा खरा चेहरा पुढे, थेट जावयानेच केला मोठा खुलासा

संगमनेर / नगर सह्याद्री - इंदुरीकर महाराज त्यांच्या कीर्तनामुळे कायमच चर्चेत असतात. मात्र, मुलीचा...